आदित्य ठाकरेंच्या 'त्या' विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला निशाणा, म्हणाले.....

| Published : Apr 24 2024, 07:49 AM IST / Updated: Apr 24 2024, 08:06 AM IST

CM Eknath Shinde

सार

Maharashtra : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून निशाणा साधला आहे. याशिवाय हा माझा अपमान नव्हे तर सर्व शेतकऱ्यांच्या मुलांसह, गरीब माता-भगिनींचा अपमान असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेय.

Maharashtra Politics :  बुलढाणा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी (23 एप्रिल) जाहीर सभा झाली. या सभेतच मुख्यमंत्र्यांनी 'नीच' शब्दावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, “आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी अपशब्द वापरला. माझ्यासाठी अशा शब्दाचा वापर केला जातोय. जर एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसमान्य कामगाराचा मुलगा मुख्यमंत्री होतोय तर ठाकरेंना सहन होत नाहीये.”

मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी नक्की काय म्हटले?
मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी बुलढाण्यातील सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, "उबाठामध्ये ‘बाप 1 नंबरी आणि बेटा 10 नंबरी’ आहेत. आदित्य ठाकरेंनी माझ्यासाठी अपशब्दाचा वापर केला. एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, हे त्यांना सहन झालेले नाही. त्यांनी माझा नाही तर गोरगरिब, शेतकरी माता भगिनी आणि माझ्या समाजाचा अपमान केला आहे." आता याचे उत्तर तुम्ही मतपेटीतून द्या असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी मतदारांना केले आहे.

उद्धव सरकारने भाजपा नेत्यांना अटक करण्याची योजना आखली होती- मुख्यमंत्री
गेल्या काही दिवसांआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक मोठा खुलासा केला होता. मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख भाजपा नेत्यांना अटक करण्याची योजना आखली होती. याशिवाय महाविकास आघाडी सरकार भाजपातील आमदारांच्या एका वर्गाला आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात होती.

सात टप्प्यात होणार निवडणूक
देशभरात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जूनला मतदान होणार आहे. मतदानाचे निकाल 4 जूनला जाहीर केले जाणार आहेत.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : अमरावतीत प्रचार सभेवरून वाद; सभेच्या मैदानावरुन आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात पंतप्रधान मोदींची सभा, रोड शो चेही आयोजन

Read more Articles on