शुद्ध-नैसर्गिक मध खरेदी करायचंय? मग कोल्हापुरातल्या या गावाला नक्की द्या भेट

| Published : Dec 02 2023, 06:43 PM IST / Updated: Dec 04 2023, 01:41 PM IST

Honey Village

सार

Kolhapur: मधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. बाजारात वेगवेगळ्या ब्रॅण्डचे मध मिळते. पण शुद्ध मध खरेदी करायचे असल्यास महाराष्ट्रातील या मधाच्या गावाला नक्की भेट देऊ शकता. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर…

Organic Honey in Kolhapur : हल्ली प्रत्येक जण आपल्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेण्यावर भर देत आहे. यासाठी डाएटमध्ये पौष्टिक व नैसर्गिक खाद्यपदार्थांचाच मोठ्या प्रमाणात समावेश केला जातोय. याचाच एक भाग म्हणून हल्ली कित्येक जण साखरेऐवजी मध किंवा गुळाचे सेवन करण्यास प्राधान्य देताहेत. कारण तुलनेनं मध व गूळ शरीरासाठी लाभदायक मानले जाते. पण हल्लीच्या भेसळयुक्त जगात नैसर्गिक व शुद्ध मध मिळणं जरा कठीणच झालंय. पण चिंता करू नका, तुम्हाला शुद्ध व नैसर्गिक मध मिळणाऱ्या गावाचा पत्ता आम्ही दिला तर? हो तुम्ही वाचलंय ते अगदी खरंय.

मधाचे गाव

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात ‘पाटगाव’ हे निसर्गाने सजलेले सुंदर गाव आहे. सह्याद्री डोंगर रांगांच्या पायथ्याशी वसलेले पाटगाव हे मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पाटगावाअंतर्गत शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, भारमलवाडी, डेळे, चांदमवाडी, मानी, तळी, भटवाडी या परिसरामध्ये मधमाशा पालनाचा व्यवसाय केला जातो. पाटगावात वर्षभराला सर्वसामान्यपणे 8-10 टन मधाचे उत्पादन होते. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संकल्पनेतून ‘मधाचे गाव पाटगाव’ ही नवी संकल्पना राबवण्यात आली.

पाटगाव परिसरात मध निर्मिती-विक्री उद्योगाला प्रोत्साहन देऊन येथील शुद्ध व नैसर्गिक मध जगभरात पोहोचवण्यासाठी राज्य शासन-प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मध उद्योगासोबत पर्यटनपूरक व्यवसायांना चालना देऊन येथील नागरिकांचा सर्वांगीण विकास साधण्यावरही भर दिला जात आहे.

असे सुरू आहे गावात काम

  • पाटगावसह पाच ग्रामपंचायती एकत्रित येऊन शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती केली जाते
  • मधमाशा पुरक व औषधी गुणधर्म असलेली वृक्षलागवड केली जाते
  • मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी पाटगावास मधाचे गाव ब्रँड तयार करण्यात आला आहे.
  • मधाला योग्य बाजारभाव मिळवून देऊन मध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

Content/Photo Credit : महासंवाद वेबसाइट

बाल स्वास्थ्य योजना गांगुर्डे कुटुंबासाठी ठरली संजीवनी! मुलाला श्रवणशक्ती मिळाल्याने आयुष्यच बदललं

वाचनाची आवड आहे? राज्याच्या या शहरात उभारलीय चक्क पुस्तकांची बाग

Success Story : कलेतून घडवला स्वतःचा बिझनेस, वाचा माळशेज घाटातील तरूणाची प्रेरणादायी कहाणी