सार
Maharashtra Lok Sabha Election 2024 : धाराशिवमध्ये लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागले आहे. या घटनेत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे दिसून आले.
Dharashiv Lok Sabha Seat : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मदतान सध्या सुरू आहे. यामध्ये 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून 94 लोकसभेच्या जागांवर मतदान केले जात आहे. अशातच एक महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिवमधील ठाकरे गटातील कार्यकर्त्याच्या चाकू हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
नक्की काय घडलेय?
धाराशिवमध्ये मतदान सध्या सुरू आहे. अशातच भूम येथे शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर वाद झाला. वाद एवढा टोकाला गेला की, यामध्ये ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याच्या मृत्यू झाला आहे. समाधान पाटील असे मृत कार्यकर्त्याचे नाव आहे. असे सांगितले जातेय की, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर 20-22 कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यामध्ये ठाकरे गटाचे तीन ते चार कार्यकर्ते जखमीही झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर काही वेळ मतदान थांबवण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा मतदान केंद्रावर मतदान सुरू करण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाले आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
धाराशिवमधील उमेदवार
धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अर्चना पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अर्चना पाटील तुळजापूरचे भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. दुसऱ्या बाजूला धाराशिमध्ये ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांना निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले. अशातच धाराशिवमध्ये अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये लढत होत आहे.
हातकणंगले येथे कार्यकर्ते भिडले
हातकणगंले येथेही मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये साखराळे मतदान केंद्रावर वाद झाला. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना बाजूला केल्याचे काम केले.
महाराष्ट्रात 11 मतदारसंघामध्ये मतदान
महाराष्ट्रात आज (07 मे) बारामती, कोल्हापूर, लातूर, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, रायगड, सांगली, सातारा आणि हातकणंगले येथे मतदान पार पडत आहे. यानंतर महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी 13 जागांवर मतदान होणार आहे. मतदानाचा निकाल 4 जून रोजी जाहीर केला जाणार आहे.
आणखी वाचा :
मोठी बातमी ! काँग्रेसला सोडचिठ्ठी देत संजय निरुपम यांनी 19 वर्षानंतर पुन्हा हाती घेतले शिवधनुष्य
Lok Sabha Election 2024 : शरद पवार उद्धव ठाकरेंना बाहेर थांबा म्हणाले ? नेमकं व्हिडिओमध्ये काय ?