सार

2005 साली त्यांनी शिवसेनेची साथ सोडली होती, त्यानंतर आज पुन्हा त्यांनी शिवसेनेत दाखल झाले आहेत. संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलं आहे.

संजय निरुपम यांनी १९ वर्षांनंतर शिवसेनेत पुन्हा एका प्रवेश केला आहे. 2005 साली त्यांनी शिवसेनेची साथ सोडली होती, त्यानंतर आज पुन्हा त्यांनी शिवसेनेत दाखल झाले आहेत. संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलं आहे.

संजय निरुपम यांच्या पक्षप्रवेश वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी संजय निरुपम यांचे शिवसेनेत स्वागत करतो. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेशी संबंधित आहेत. शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनी संजय निरुपम यांना दोनदा राज्यसभेवर पाठवले होते. त्यांना निवडणूक लढवायची होती, पण मी त्यांना पक्षासाठी काम करायला सांगितल्यावर ते तयार झाले आणि त्यांनी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे मी त्यांचे स्वागत करतो.

2005 पासून काँग्रेस सोबत :

2005 मध्ये संजय निरुपम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2009 च्या निवडणुकीत त्यांनी मुंबई उत्तर लोकसभा जागा जिंकली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा अल्प फरकाने पराभव केला. गेल्या 19 वर्षात त्यांनी काँग्रेसमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. 

मी बाळासाहेबांचे विचार मानणारा :

पक्ष प्रवेश केल्या नंतर संजय निरुपम म्हणाले की, १९ वर्षानंतर आज मी स्वगृही परतलो आहे आणि एकटा नाही, तर संपूर्ण कुटुंबासह शिवसेनेत प्रवेश केला आहे. माझ्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असून माझ्या रक्तात बाळासाहेबांचे विचार आहेत. गेल्या १९ वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये होतो, 2005 मध्ये मी शिवसेनेतून बाहेर पडलो. काँग्रेसमध्ये राहून बाळासाहेबांच्या विचाराने काम करण्यात अडचण येत होती, ती अडचण आता दूर केली असून पक्षासाठी काम करणार आहे.