सार

महायुतीच्या जागावाटपामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही.

महायुतीच्या जागावाटपामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. येथे महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना तिकीट जाहीर केले असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. श्रीकांत शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी हेमंत गोडसे यांचे तिकीट जाहीर केले होते पण महायुतीला येथूनही तिकीट जाहीर करता आले नाही, 

मराठा नेते मनोज जरांगे काय म्हणाले? 
मराठा नेते मनोज जरांगे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक लोकसभेतून छगन भुजबळ यांनी उभे राहावे मग आम्ही दाखवतो असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. मनोज जरांगे हे आज पुण्यातील देहूत संत तुकाराम महाराजांच्या चरणी पाय पडले होते. भुजबळ यांच्याबद्दल काही सांगू नका, त्यांनी लोकसभा निवडणूक लढवायचा निर्णय जाहीर केल्यावर आमची भूमिका सांगतो असे मराठा नेते मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर केले जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. मराठा समाजाला राज्यभर कोणाला उभं करायच हे ठरवावा. मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर कायमच आरोप केले जात आहे. 
आणखी वाचा - 
माणूस आहे की राक्षस ? पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले २०० हुन अधिक तुकडे; नंतर मृतदेह मित्राच्या मदतीने फेकला नदीत
केरळमधील जेएस सिद्धार्थनचा तब्बल २९ तास मानसिक छळ ; पोलीस अहवालात धक्कादायक माहिती