सार

Sharad Pawar on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांना शेतकऱ्यांची माफी मागा असे एका सभेत म्हटले. यावरूनच आता शरद पवारांनी प्रतिउत्तर दिले आहे.

Sharad Pawar on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर निशाणा साधत म्हटले होते की, त्यांनी त्या शेतकऱ्यांची माफी मागावी ज्या शेतकऱ्यांनी शरद पवार कृषी मंत्री असताना आत्महत्या केली होती. बुधवारी (24 एप्रिल) अमरावती येथे महायुतीमधील उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी हे विधान केले. याशिवाय अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. यावरच आता शरद पवारांनी प्रतिउत्तर दिले आहे.

काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांनी म्हटले की, गेल्या दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण अत्याधिक वाढले गेले आहे. यामुळे अमित शाह तुम्ही आधी हे सांगा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तुम्ही गेल्या दहा वर्षात काय केले?"

शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा
शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटले की, पंतप्रधानांमुळे देशातील शेतकरी संकटात आहे. सरकारने केवळ आश्वासने दिली आहेत. याचा फटका सामान्य नागरिकाला बसत आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी जेथे जातात तेथून काँग्रेसवरच हल्लाबोल करतात. याशिवाय अन्य काही मुद्द्यांवरही शरद पवारांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात भाजपला धक्का
ऐन लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाला महाराष्ट्रात धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय राहिलेले संजय क्षीरसागर यांनी बुधवारी (24 एप्रिल) शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे. संजय क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आल्याने माढा लोकसभेला मजबूती मिळणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांनुसार, संजय क्षीरसागर यांच्याकडे भाजपाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी लावला आहे. यामुळे भाजपाला रामराम ठोकत क्षीरसागर शरद पवारांच्या गटात आल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा : 

शिखर बँकेच्या कथित 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट

आदित्य ठाकरेंच्या 'त्या' विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला निशाणा, म्हणाले..…