MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • कोकण रेल्वेची मोठी अपडेट! उन्हाळी सुट्टीत मुंबई-गोवा प्रवाशांची चंगळ; धावणार 'समर स्पेशल' गाड्या, पाहा पूर्ण वेळापत्रक

कोकण रेल्वेची मोठी अपडेट! उन्हाळी सुट्टीत मुंबई-गोवा प्रवाशांची चंगळ; धावणार 'समर स्पेशल' गाड्या, पाहा पूर्ण वेळापत्रक

Mumbai to Goa summer special trains: उन्हाळी सुट्ट्यांमधील गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबई ते मडगाव साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. या गाड्या CSMT आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून सुटतील. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 17 2026, 03:57 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
उन्हाळी सुट्टीत मुंबई गोवा प्रवाशांची चंगळ
Image Credit : Asianet News

उन्हाळी सुट्टीत मुंबई-गोवा प्रवाशांची चंगळ

मुंबई: रखरखत्या उन्हात एसटीचा प्रवास नको वाटणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि पर्यटकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबई ते मडगाव दरम्यान विशेष 'साप्ताहिक' गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे पर्यटकांना आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सुखकर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. 

25
१. मुंबई CSMT ते मडगाव (साप्ताहिक विशेष)
Image Credit : social media

१. मुंबई CSMT ते मडगाव (साप्ताहिक विशेष)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी ही गाडी प्रामुख्याने गुरुवारी उपलब्ध असेल.

ट्रेन क्रमांक: ०११७१ / ०११७२

कालावधी: १६ एप्रिल ते ११ जून २०२६ (दर गुरुवारी)

वेळ (जाताना): मुंबईहून मध्यरात्री १२:२० वाजता सुटणार; दुपारी ३:१५ वाजता मडगावला पोहोचणार.

वेळ (परतीचा प्रवास): मडगाववरून सायंकाळी ६:०० वाजता सुटणार; दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबईत पोहोचणार. 

Related Articles

Related image1
ST Bus : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर तोडगा; निवृत्तांना पत्नीसह मोफत प्रवास
Related image2
Mumbai : मुलुंड स्थानकात थरकाप उडवणारी घटना; पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले
35
२. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव
Image Credit : Social Media

२. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव

कुर्ला टर्मिनसवरून सुटणारी ही गाडी दर शुक्रवारी कोकणाकडे धावेल.

ट्रेन क्रमांक: ०१११९ / ०११२०

कालावधी: १७ एप्रिल ते १२ जून २०२६ (दर शुक्रवारी)

वेळ (जाताना): LTT वरून मध्यरात्री १२:५५ वाजता सुटणार; दुपारी ३:१५ वाजता मडगावला पोहोचणार.

वेळ (परतीचा प्रवास): मडगाववरून शुक्रवारी सायंकाळी ६:०० वाजता सुटणार; दुसऱ्या दिवशी पहाटे ३:३० वाजता मुंबईत पोहोचणार. 

45
प्रमुख थांबे (Haltings)
Image Credit : South Western Railways - SWR

प्रमुख थांबे (Haltings)

प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्यांना महत्त्वाच्या सर्व स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

दादर (फक्त CSMT ट्रेनसाठी), ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी. 

55
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या टिप्स
Image Credit : South Western Railways - SWR

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या टिप्स

या विशेष गाड्यांचे आरक्षण त्वरित सुरू होणार असल्याने प्रवाशांनी 'IRCTC' च्या वेबसाईटवरून आगाऊ नियोजन करावे.

उन्हाळी गर्दी टाळण्यासाठी या साप्ताहिक गाड्यांचा पर्याय सर्वोत्तम ठरेल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
Recommended Stories
Recommended image1
ST Bus : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर तोडगा; निवृत्तांना पत्नीसह मोफत प्रवास
Recommended image2
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात अवकाळीचा कडाका! १२ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'; उकाड्यातून सुटका की संकट?
Recommended image3
स्वेच्छेने धर्मांतर करायचंय? मग 'ही' प्रक्रिया आहे अनिवार्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात मांडला नवा नियम
Recommended image4
Pune Metro Expansion: पुणेकरांनो, ट्रॅफिक जॅमला 'बाय-बाय' करण्याची वेळ आली! मेट्रोचे २०० किमीचे जाळे पसरणार; पुण्याचा असा बदलणार चेहरा
Recommended image5
पुणे मेट्रोचा वाघोलीपर्यंत धडाका! रामवाडी-वाघोली मार्गाची पाहणी पूर्ण; 'दुमजली' उड्डाणपूल आणि १२ स्टेशन्स, असा आहे मेगा प्लॅन
Related Stories
Recommended image1
ST Bus : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर तोडगा; निवृत्तांना पत्नीसह मोफत प्रवास
Recommended image2
Mumbai : मुलुंड स्थानकात थरकाप उडवणारी घटना; पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved