11:46 PM (IST) Jul 02

2nd July 2025 News Updates महाराष्ट्रात कुठं होणार मुसळधार पाऊस कुठं तुरळक, वादळी वाऱ्यासह या भागाला दिला रेड अलर्ट

हवामान विभागाने मुंबईसह महाराष्ट्रात उद्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Read Full Story
10:24 PM (IST) Jul 02

2nd July 2025 News Updates व्हाट्स अँपच आलं नवीन फिचर, आता नंबर न दाखवता बोलता येणार

व्हाट्स अँप एक नवीन युजरनेम फिचर आणत आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना मोबाईल नंबर न दाखवता संपर्क साधता येईल. हे फिचर प्रायव्हसीसाठी फायदेशीर असले तरी, यामुळे ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल अरेस्टचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read Full Story
10:21 PM (IST) Jul 02

2nd July 2025 News Updates मुंबई पालिका मागील चुकांवरुन काहीच शिकली नाही - सरदेसाईंची टीका

मुंबईमध्ये मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून विधानसभेत जोरदार चर्चा झाली. आमदार वरून सरदेसाई यांनी या दुर्घटनेवर आवाज उठवताना मुंबईतील अनियंत्रित होर्डिंगच्या समस्येवरही बोट ठेवले, ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.
Read Full Story
09:08 PM (IST) Jul 02

2nd July 2025 News Updates Gold Rate Today - सोने - चांदी दरात वाढ, मुंबईतील आजचा १० ग्रॅमचा भाव काय?

Gold Rate Today : सोने-चांदी दरात आज वाढ झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून किमतीत चढ-उतार होत आहेत. अमेरिका आणि इराण या दोन देशांतील संघर्षाचा परिणाम भारतातील सराफा बाजारात मौल्यवान धातूवर झाल्याचं दिसतं आहे.

Read Full Story
07:42 PM (IST) Jul 02

2nd July 2025 News Updates सिया गोयलच्या वकिलाचा केतन - लोहगड प्रकरणात धक्कादायक दावा

केतन अग्रवाल हत्याकांडात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक झाली असून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सियाने कोर्टात तिचे वकील विपुल दुशिंग असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे केतनच्या मोबाईलमधून डेटा डिलीट झाल्याचा संशय पोलिसांना आहे, ज्यामुळे प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

Read Full Story
07:08 PM (IST) Jul 02

2nd July 2025 News Updates Sakinaka Incident - मुंबईत गटारीच्या बोगद्यात पडून मृत्यू, मुंबई पालिका आयुक्ताचं उत्तर ऐका

Sakinaka Manhole Incident : साकीनाका परिसरात एक व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी माहिती दिली आहे.

Read Full Story
06:51 PM (IST) Jul 02

2nd July 2025 News Updates Sanjay Raut | एकेदिवशी ऑपरेशन कमळची, राऊत यांचा दावा

संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर 'ऑपरेशन कमळ'च्या माध्यमातून पक्ष फोडत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी 'ऑपरेशन तुतारी' करण्याचा प्रयत्न केल्यास इशारा दिला असून, अमोल कोल्हे मूळ पक्षातच राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे. देशातील लोकशाही धोक्यात असल्याचेही त्यांनी म्हटले.
Read Full Story
05:15 PM (IST) Jul 02

2nd July 2025 News Updates बिष्णोई गँगकडून आता या आमदाराला धमकी, यावर विधानसभेत रणकंदन

अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिष्णोई गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे प्रकरण विधानसभेत गाजले. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आमदाराच्या सुरक्षेची मागणी करत, बिष्णोई गॅंग मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाही अशी टीका करत सरकारला धारेवर धरले.
Read Full Story
04:32 PM (IST) Jul 02

2nd July 2025 News Updates EPFO Update - PF पोर्टल बंद, सेवा ठप्प; नेमकं काय आहे कारण?

EPFO Portal Down : ईपीएफओ पोर्टल डाऊन झाल्याने अनेक नोकरदारांना पीएफसंबंधी कामं करताना सतत एरर येत आहे. या पीएफ पोर्टलबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Read Full Story
02:52 PM (IST) Jul 02

2nd July 2025 News Updates Ketan Agarwal Case - लग्नानंतर राजस्थानला राहण्याचा प्लॅन; सियाकडून पैशांची सोय, चेतनच्या मित्रांची माहिती

Pune Ketan Agarwal Lohagad Case : पुण्यातील केतन अग्रवालची त्याच्याच होणाऱ्या पत्नीने हत्या केली. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी दोघांनी लग्न करुन राजस्थानला राहण्याचा प्लॅन केला होता अशी माहिती समोर आली आहे.

Read Full Story
02:31 PM (IST) Jul 02

2nd July 2025 News Updates साकीनाका खैरानी रोडवरील मॅनहोलमध्ये पडला माणूस, व्यक्तीचा मृत्यू झाल्याची उपमहापौरांची माहिती

चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाडं पडल्याची घटना ताजी असताना आणखी एक दुर्घटना घडली आहे. साकीनाका खैरानी रोडवर मोठी दुर्घटना घडली असून तेथील एका मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्याची बातमी समोर आली आहे.

Read Full Story
12:52 PM (IST) Jul 02

2nd July 2025 News Updates येत्या ४ आणि ५ जुलैला अतिमुसळधार पावसाची शक्यता

येत्या ४ आणि ५ जुलैला अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले आहे. तसेच परिस्थितीनुसार शाळांबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतला जाईल. 

12:04 PM (IST) Jul 02

2nd July 2025 News Updates मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा विचार

मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा विचार होत आहे. यावर शिवसेनेच्या विधान परिषदेच्या सदस्या डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मनीषा कायंदे यांनी म्हटले की, ‘आम्ही सर्वजण श्रीकांत शिंदेंना शुभेच्छा देतो. मला वाटते की हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा विशेषाधिकार आहे. तसेच आमचे नेते एकनाथ शिंदे यावर निर्णय घेतील.’

11:16 AM (IST) Jul 02

2nd July 2025 News Updates मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर साचले पाणी

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

Scroll to load tweet…