व्हाट्स अँप एक नवीन युजरनेम फिचर आणत आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना मोबाईल नंबर न दाखवता संपर्क साधता येईल. हे फिचर प्रायव्हसीसाठी फायदेशीर असले तरी, यामुळे ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल अरेस्टचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
व्हाट्स अँप कंपनी युजरसाठी कायमच नवीन काहीतरी घेऊन येत असते. आता कंपनीने नवीन फिचर मार्केटमध्ये आणलं आहे. आता युजरला स्वतःच युजरनेम मोबाईलचा वापर न करता तयार करता येणार आहे. त्यामध्ये आपण मोबाईल नंबर दाखवायचं बंधन नाही. त्यामुळं याचा युजरच्या प्रायव्हसीला प्राधान्य दिलं जाईल असं सांगण्यात आलं आहे.

वेगळं युजरनेम ठेवता येणार
आता वापरकर्त्या व्यक्तीला वेगळं युजरनेम ठेवता येणार आहे. हे फिचर टप्याटप्याने अपडेट केलं जाणार असून वर्षाच्या अखेरपर्यंत ते युजरपर्यंत येईल असं सांगण्यात आलं. या नवीन अपडेटमुळं वापरकर्त्याला याचा तोटाच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळं ऑनलाईन फसवणूक, डिजिटल अरेस्टच प्रमाण वाढू शकत.
प्रायव्हसीवर देण्यात आला भर
कंपनीकडून प्रायव्हसीवर भर देण्यात आल्याचं कारण देण्यात आलं. वापरकर्त्यांना त्यांचा मोबाईल नंबर सुरक्षित ठेवून नवीन लोकांशी यामुळं संपर्क साधता येणार आहे. एखाद्या व्यक्तीशी जर आपल्याला संपर्क साधायचा असेल तर अचूक युजरनेम असणं आवश्यक झालं आहे. कंपनीनं युजरनेम सोबत चार अंकी पासवर्डचा पर्याय दिला आहे.


