Gold Rate Today : सोने-चांदी दरात आज वाढ झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून किमतीत चढ-उतार होत आहेत. अमेरिका आणि इराण या दोन देशांतील संघर्षाचा परिणाम भारतातील सराफा बाजारात मौल्यवान धातूवर झाल्याचं दिसतं आहे. 

मुंबई : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा परिणाम भारतासह इतरही देशांवर होताना दिसतो आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे सोने-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत. आज गुरूवारी, २ जुलै रोजी सोन्याचे भाव कमी-जास्त होते. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोन्याचा भाव काहीसा उतरला आहे. तर सराफा बाजारात मात्र सोने दरात मोठी वाढ झाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ३७७० रुपयांनी वाढला. त्यामुळे सोने दर १,४४,५५० रुपयांवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेटचा भाव ३४५० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे २२ कॅरेट सोन्याचा दर १,३२,५०० रुपये इतका आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात २८२० रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे १८ कॅरेटचा दर १,०८,४१० रुपये इतका झाला आहे.

दुसरीकडे चांदीचा दरही वाढला आहे. चांदीच्या किमतीत ५००० रुपयांची वाढ झाल्याने भाव २,४५,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

MCX वर सोने-चांदी दरात चढ-उतार

दरम्यान, सकाळी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने दरात ५०० रुपयांची, त्याहून अधिक घसरण झाली. आज सोनं सराफा बाजारात भाव मागील आठवड्याच्या तुलनेत कमी किमतीत उघडला. मागील सत्रात ५ ऑगस्ट डिलीव्हरी सोन्याचा भाव १,४४,४३० रुपये १० ग्रॅम इतका होता. तर आज सोन्याचा सुरुवातीचा भाव १,४३,८८२ रुपये सराफा बाजारातील दर होता. त्यानंतर त्यात ६०५ रुपयांची घसरण झाली. यामुळे दर १,४३,८२५ रुपये इतका झाला.

सोन्यासह चांदीच्या दरातही चढ-उतार होत आहेत. ४ सप्टेंबर रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा दर मागील सत्रात प्रति किलो २,३०,३८४ रुपयांवर बंद झाला होता. मात्र आज चांदीचा दर २,३१,१९६ इतका होता. त्यानंतर पुन्हा भाव वाढ झाली. या वाढीसह दर २,३२,३३९ पर्यंत पोहोचला.