संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर 'ऑपरेशन कमळ'च्या माध्यमातून पक्ष फोडत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी 'ऑपरेशन तुतारी' करण्याचा प्रयत्न केल्यास इशारा दिला असून, अमोल कोल्हे मूळ पक्षातच राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे. देशातील लोकशाही धोक्यात असल्याचेही त्यांनी म्हटले.

मुंबई - संजय राऊत यांनी विरोधी पक्षांवर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी ऑपरेशन कमळ असल्याचा आरोप राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, पश्चिम बंगाल येथे आमदार आणि खासदार यांच्यावर हल्ले सुरु आहेत. आपल्या देशात राजकारण खालच्या पातळीवर नेऊन ठेवलं आहे. भविष्यात आपल्याला सांगावं लागेल की, या देशामध्ये लोकशाही होती.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

या देशात लोकशाही होती असं सांगावं लागेल 

डॉ. अमोल कोल्हे यांचा यावेळी उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, अमोल कोल्हे यांनी ऑफर आली तर महायुतीमध्ये जाऊ असं सांगितलं होतं. मी अमोल कोल्हे यांना चांगलाच ओळखतो. अमोल कोल्हे यांना मी शिवसेनेत असल्यापासून ओळखतोय. आता ते शरद पवार यांच्यासोबत काम करत आहेत. त्यांना निवडून आणण्यामागे हजारो शिवसैनिकांचा हात आहे.

अमोल कोल्हे मूळ पक्षात राहतील याबद्दल शंका नाही 

अमोल कोल्हे हे मूळ पक्षात राहतील याबद्दल मला कोणतीही शंका नाही. सत्ताधाऱ्यांना पक्ष फोडण्याची सवय लागली आहे. ऑपरेशन तुतारी करताय, तर ऑपरेशन आमच्या पक्षाचं टायगर बियगर घेऊ नका. राज ठाकरे हे जे बोलत आहेत ते बरोबर आहे. उद्धव ठाकरे यांनी अनेकांवर विश्वास ठेवलाय ते सोडून जात आहेत. यावेळी संजय राऊत हे कडक शब्दात कडाडले आहेत.