Motorola कंपनीच्या या स्मार्टफोनवर दिला जातोय तब्बल 20 हजार रूपयांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या फीचर्स

| Published : Jan 27 2024, 04:32 PM IST / Updated: Jan 27 2024, 04:35 PM IST

Moto Smartphone

सार

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर येत्या 30 जानेवारीपर्यंत Moto Days सेल सुरू आहे. या सेलमध्ये मोटोरोला कंपनीच्या Motorola Razr 40 Ultra आणि Motorola Razer 40 स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर आणि डिस्काउंट मिळणार आहे. 

Amazon Moto Days : नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास अ‍ॅमेझॉनच्या ‘मोटो डेज सेल’ चा फायदा घेता येणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला मोटोरोला कंपनीच्या स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स मिळणार आहेत. येत्या 30 जानेवारीपर्यंत मोटो डेज सुरू राहणार आहे. मोटोरोला कंपनीचा स्टाइलिश फोन Motorola Razer 40 (8GB+256GB) आणि Motorola Razr 40 Ultra स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर आणि डिस्काउंटसोबत खरेदी करता येणार आहे.

Motorola Razr 40 Ultra स्मार्टफोनवर तुम्हाला तब्बल 20 हजार रूपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. स्मार्टफोन 89 हजार 999 रूपयांना लाँच करण्यात आला होता. पण 20 हजार रूपयांचा डिस्काउंट देत 69 हजार 999 रूपयांना खरेदी करता येणार आहे.

Motorola Razr 40 Ultra स्मार्टफोनचे फीचर्स

  • स्मार्टफोनसाठी 6.9 इंचाचा फुल HD+pPLED फोल्डेबल डिस्प्ले दिला आहे. बाहेरची स्क्रिन 3.6 इंचाची असून pOLED कव्हर डिस्प्लेसह येणार आहे.
  • फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर दिला आहे.
  • फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनचा बॅक कॅमेरा 12 MPचा दिला असून मुख्य कॅमेरा OIS आणि 13 MP अल्ट्रा-वाइड+मॅक्रो सेंसरसह LED फ्लॅशसोबत येणार आहे. याशिवाय 32MP चा सेल्फी कॅमेरा आणि कव्हरवर 8MP कॅमेरा दिला आहे.
  • फोनला IP53 ची रेटिंग दिली आहे.
  • फोनच्या चार्जिंगसाठी 3800mAh ची बॅटरी दिली आहे. जी 33W फास्ट चार्जिंगसह येणार आहे.

Motorola Razr 40 (8GB+256GB) स्मार्टफोन डिस्काउंट आणि फीचर्स
मोटोरोला कंपनीने Motorola Razr 40 स्मार्टफोन 59 हजार 999 रूपयांच्या किंमतीत लाँच केला होता. पण अ‍ॅमेझॉनवर सुरू असणाऱ्या सेलमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन फक्त 44 हजार 999 रूपयांना खरेदी करता येणार आहे. स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे बंधन बँकेच्या डेबिट कार्डचा (Bandhan Bank Debit Card) वापर केल्यास 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट देखील मिळणार आहे.

कंपनी स्मार्टफोनवर 41 हजार 250 रूपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील देत आहे. लक्षात असू द्या, फोन एक्सजेंचवेळी मिळणारा डिस्काउंट तुमच्या फोनची कंडिशन, ब्रॅण्ड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर आधारित असणार आहे. फोन तुम्हाला 2 हजार 182 रूपयांच्या EMI वर देखील खरेदी करता येणार आहे.

Motorola Razr 40 फिचर्स

  • स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7th Zen 2 चिपसेट मिळणार आहे.
  • 1080x2640 पिक्सल रेज्यॉल्यूशन असणारा 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस मेन फ्लेक्सिबल डिस्प्ले मिळणार आहे.
  • डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144Hz आहे.
  • फोटोग्राफीसाठी कंपनीने फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे.याशिवाय फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा एक अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
  • फोनमध्ये 4200mAh ची बॅटरी दिली असून जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.

आणखी वाचा : 

Jio कंपनीकडून या रिचार्जवर मिळतायत धमाकेधार ऑफर्स, शॉपिंग ते फ्लाइट बुकिंगवर मिळणार सूट

Cyber Insurance म्हणजे काय? डिजिटल युगात या कारणास्तव आहे महत्त्वाचा

Flipkart Republic Day Sale 2024 : आयफोन 15 सह या स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स, जाणून घ्या अधिक