Flipkart Republic Day Sale 2024 : आयफोन 15 सह या स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स, जाणून घ्या अधिक

| Published : Jan 15 2024, 02:09 PM IST / Updated: Jan 15 2024, 02:12 PM IST

iPhone 15 Pro

सार

Flipkart Republic Day Sale : ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल सुरू झाला आहे. या सेलदरम्यान तुम्हाला स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स दिल्या जात आहेत. कमी किंमतीत आयफोन ते लेटेस्ट स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करता येणार आहे.

Flipkart Republic Day Sale 2024 : नवा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करायचा असल्यास फ्लिपकार्टच्या (Flipkart) रिपब्लिक डे सेलचा (Republic Day Sale) नक्कीच फायदा तुम्ही घेऊ शकता. या सेलदरम्यान तुम्हाला लेटेस्ट स्मार्टफोन कमी किंमतीत आणि धमाकेदार ऑफर्समध्ये खरेदी करता येणार आहेत. सेलमध्ये तुम्हाला आयफोन 15 वर जबरदस्त सूट दिली जात आहे.

iPhone 15
अ‍ॅपल कंपनीचा आयफोन 15 स्मार्टफोनची मूळ किंमत 79 हजार रूपये आहे. पण फ्लिपकार्टच्या सेलमध्ये या फोनवर तुम्हाला 17 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला iPhone 15 केवळ 65 हजार 990 रूपयांना खरेदी करता येणार आहे. फोनवर एक्सजेंच डिस्काउंट आणि बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहे. याशिवाय फोन खरेदीवर तुम्ही 15 हजार रूपयांची बचतही करू शकता.

iPhone 14
अ‍ॅपल कंपनीचा आयफोन 14 फ्लिपकार्टवर तुम्हाला 57 हजार 999 रूपयांना खरेदी करता येणार आहे. या फोनची मूळ किंमत 69 हजार 900 रूपये आहे. आयफोन 14 साठी कंपनी 54 हजार 990 रूपयांपर्यंत एक्सजेंच डिस्काउंट ऑफर देत आहे. म्हणजेच उत्तम प्रीमियम फोन तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता.

Redmi Note 13 Pro+
रेडमी नोट 13 सीरिजच्या प्रो प्लसमधील 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या फोनला तुम्ही 31 हजार 999 रूपयांना खरेदी करू शकता. ICICI बँक कार्डच्या माध्यमातून फोनवर दोन हजार रूपयांपर्यत डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय काही निवडक मॉडेल्सवरही दोन हजार रूपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर दिली जात आहे.

Asus ROG Ally
गेल्या वर्षात भारतात 69 हजार 990 रूपयांत लाँच झालेल्या या फोनवर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 10 हजार रूपयांपर्यंत सूट मिळणार आहे. स्मार्टफोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेट व्हेरियंटला 59 हजार 990 रूपयांत खरेदी करता येणार आहे. ICICI बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास दीड हजार रूपयांपर्यंत अतिरिक्त सूट दिली जात आहे.

या स्मार्टफोनवरही जबरदस्त सूट
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मोटोरोला Motorola Edge 40 Neo स्मार्टफोन 21 हजार 999 रूपये, सॅमसंग S21 FE 5G स्मार्टफोन 29 हजार 999 रूपये आणि Nothing Phone 2 तुम्हाला 34 हजार 999 रूपयांत खरेदी करता येणार आहे. याशिवाय Realme 11 Pro 5G स्मार्टफोन 21 हजार 999 रूपयांत खरेदी करता येणार आहे.

आणखी वाचा : 

या क्रमांकावर चुकूनही करू नका फोन, सरकारने दिलाय सावधगिरीचा इशारा

घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अशी रद्द करा भारतीय रेल्वेची Counter Ticket

कमी बजेटमध्ये नवा फोन खरेदी करायचाय? Xiaomiच्या या तीन स्मार्टफोनचे पर्याय आहेत बेस्ट