Jio कंपनीकडून या रिचार्जवर मिळतायत धमाकेधार ऑफर्स, शॉपिंग ते फ्लाइट बुकिंगवर मिळणार सूट

| Published : Jan 17 2024, 09:30 AM IST / Updated: Jan 17 2024, 10:37 AM IST

jio recharge plan
Jio कंपनीकडून या रिचार्जवर मिळतायत धमाकेधार ऑफर्स, शॉपिंग ते फ्लाइट बुकिंगवर मिळणार सूट
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

रिलायन्स कंपनीकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष रिचार्जवर भरघोस सूट दिली जात आहे. याशिवाय जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला काही धमाकेदार ऑफर्स मिळणार आहेत. जाणून घेऊया याबद्दल अधिक....

Reliance Jio Special Recharge : येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जाणार आहे. तत्पूर्वी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या युजर्सला एका खास रिचार्जवर धमाकेदार ऑफर्स देणार आहे. खरंतर जिओने Republic Day Offersची घोषणा केली आहे.

रिलायन्स जिओच्या 2 हजार 999 रूपयांच्या रिचार्जमध्ये तुम्हाला उत्तम डील्स आणि डिस्काउंटचा फायदा घेता येणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला प्रतिदिन 2.5GB डेटा मिळणार आहे. याशिवाय युजर्सला अन्य काही बेनिफिट्सही मिळणार आहेत. त्यानुसार शॉपिंग ते फ्लाइट बुकिंगवर सूट दिली जाणार आहे.

जिओच्या 'रिपब्लिक डे' ऑफर' बद्दलच्या खास गोष्टी

  • जिओनुसार प्लॅनमध्ये तुम्हाला Ajio शॉपिंगचे कूपन दिले जाणार आहे. तुम्ही Ajioच्या माध्यमातून 2 हजार 999 रूपयांपर्यंत शॉपिंग केल्यानंतर कूपन वापरुन 500 रूपयांपर्यंत सूट मिळवू शकता.
  • तुम्ही जिओचा 2 हजार 999 रूपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला Tira Beautyच्या माध्यमातून शॉपिंग केल्यानंतर 30 टक्के म्हणजेच एक हजार रूपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.
  • तुम्ही रिपब्लिक डे ऑफर अंतर्गत रिचार्ज केल्यास Ixigo च्या माध्यमातून फ्लाइट बुकिंग केल्यास दीड हजार रूपयांपर्यंत सूट मिळवू शकता.
  • युजर्सला Swiggyच्या माध्यमातून फूड ऑर्डर केल्यानंतर दीडशे रूपयांचे दोन कूपन मिळणार आहेत. ज्यावर तुम्हाला 250 रूपयांपर्यंत सूट मिळणार आहे.
  • जिओ रिपब्लिक डे ऑफर्स अंतर्गत रिचार्ज केल्यास तुम्ही रिलायन्स डिजिटलच्या माध्यमातून शॉपिंग केल्यास 5 हजार रूपयांपर्यंतच्या शॉपिंगवर कमीत कमी 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

जिओ कूपनचा असा घ्या फायदा
जिओच्या 2 हजार 999 रूपयांच्या रिचार्ज प्लॅनमधील सर्व कूपन्स तुम्हाला MyJio अकाउंटवर दिसणार आहेत. यानंतर तुम्ही Code Copy करून शॉपिंग करू शकता. लक्षात असू द्या, जिओच्या ‘रिपब्लिक डे रिचार्ज’ प्लॅनची ऑफर येत्या 31 जानेवारीपर्यंतच आहे. यामुळे रिचार्ज केल्यानंतर कूपन Expiry होण्याआधी वापरावे.

आणखी वाचा : 

Cyber Insurance म्हणजे काय? डिजिटल युगात या कारणास्तव आहे महत्त्वाचा

Flipkart Republic Day Sale 2024 : आयफोन 15 सह या स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स, जाणून घ्या अधिक

या क्रमांकावर चुकूनही करू नका फोन, सरकारने दिलाय सावधगिरीचा इशारा