MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Chanakya Niti : सगळ्यांवर प्रेम करायला तुम्ही देव नाही, कलियुगात जगायचंय तर चाणक्य बना!

Chanakya Niti : सगळ्यांवर प्रेम करायला तुम्ही देव नाही, कलियुगात जगायचंय तर चाणक्य बना!

जंगलात नेहमी सरळ वाढणारी झाडे आधी कापली जातात. अगदी तसंच, तुमचा जास्त चांगुलपणा तुमच्याच विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. आजच्या जगात कसं जगावं, हे सांगणारा चाणक्य नीतीचा हा महत्त्वाचा धडा नक्की वाचा.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 10 2026, 09:45 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
माणसाने कसं जगावं?
Image Credit : Chatgpt

माणसाने कसं जगावं?

माणसाने कसं जगावं?
समाजात चांगुलपणाला किंमत असते हे जितकं खरं आहे, तितकंच जास्त भोळेपणा आणि सरळ वागणं माणसाला अडचणीत आणू शकतं हेही वास्तव आहे. प्राचीन भारताचे महान रणनीतीकार आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'चाणक्य नीती'मध्ये या कटू सत्याची जाणीव करून दिली आहे. आजच्या या स्पर्धेच्या जगात माणसाने कसं जगावं, यासाठी त्यांचे हे विचार आजही उत्तम मार्गदर्शन करतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
जंगलात सरळ झाडांचाच आधी बळी जातो
Image Credit : Chatgpt

जंगलात सरळ झाडांचाच आधी बळी जातो

जंगलात सरळ झाडांचाच आधी बळी जातो
चाणक्य म्हणतात, "जंगलात कुऱ्हाड घेऊन जाणारा लाकूडतोड्या सर्वात आधी सरळ वाढलेल्या झाडांवरच घाव घालतो. वेड्यावाकड्या वाढलेल्या झाडांना तो हातही लावत नाही."

याचा सरळ अर्थ असा की, समाजात जे लोक जास्त सरळ आणि चांगले असतात, लोक त्यांना सहज टार्गेट करतात. त्यांच्या भोळेपणाचा स्वार्थासाठी गैरफायदा घेतात. त्यामुळे आयुष्यात प्रत्येकाने वेळेनुसार हुशारी आणि स्वतःचं रक्षण करण्याची वृत्ती अंगी बाणवणं खूप गरजेचं आहे.

Related Articles

Related image1
Chanakya Niti : कुटुंबात कोणाचं ऐकावं आणि कोणाकडे दुर्लक्ष करावं? चाणक्य नीती काय सांगते?
Related image2
Chanakya Niti : पगार आला की दोन दिवसांत संपतो? चाणक्यांनी सांगितलेल्या या ३ गोष्टी लगेच बदला!
34
प्रेमाने सगळंच जिंकता येत नाही
Image Credit : Chatgpt

प्रेमाने सगळंच जिंकता येत नाही

प्रेमाने सगळंच जिंकता येत नाही
सर्वांशी प्रेमाने वागावं हा एक सामान्य नियम आहे. पण जगातल्या प्रत्येक माणसाला प्रेमाची भाषा समजत नाही. "जर फक्त प्रेम आणि शांततेने सगळे प्रश्न सुटले असते, तर प्रेमाचं प्रतीक म्हणून बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाने महाभारताचं रक्तरंजित युद्ध कधीच होऊ दिलं नसतं," असं म्हटलं जातं. म्हणजेच, दुष्ट आणि स्वार्थी लोकांसमोर तुमचा चांगुलपणा काम करत नाही, तिथे कठोर भूमिका घेणं भाग पडतं.

44
तुमची किंमत तुम्हीच ओळखा
Image Credit : Chatgpt

तुमची किंमत तुम्हीच ओळखा

तुमची किंमत तुम्हीच ओळखा
माणसाने आपला स्वाभिमान कधीही गमावता कामा नये. लोक त्यांच्या सोयीनुसार आपला वापर करून घेतील, इतकंही स्वतःला स्वस्त बनवू नका. जे लोक तुम्हाला प्रेम देतात, त्यांना नक्की प्रेम द्या. पण तुमचा चांगुलपणा ही तुमची कमजोरी बनणार नाही, याची नेहमी काळजी घ्या. हाच चाणक्यांच्या जीवनविषयक धड्यांचा स्पष्ट संदेश आहे.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Silk Saree Care : सिल्कची साडी धुताना पाण्यात मिक्स करा ही एक गोष्ट, साडी दिसेल अगदी नवीकोरी!
Recommended image2
Horoscope 10th October 2026 : आज या ३ राशींचे नशीब उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य
Recommended image3
Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Recommended image4
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image5
Aluminium Foil For Plants : कुंडीतील झाडांसाठी ॲल्युमिनियम फॉइलचे ३ भन्नाट फायदे
Related Stories
Recommended image1
Chanakya Niti : कुटुंबात कोणाचं ऐकावं आणि कोणाकडे दुर्लक्ष करावं? चाणक्य नीती काय सांगते?
Recommended image2
Chanakya Niti : पगार आला की दोन दिवसांत संपतो? चाणक्यांनी सांगितलेल्या या ३ गोष्टी लगेच बदला!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved