Cyber Insurance म्हणजे काय? डिजिटल युगात या कारणास्तव आहे महत्त्वाचा
- FB
- TW
- Linkdin
सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ
डिजिटल ट्रांजेक्शन आणि सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे आर्थिक आणि खासगी माहिती सुरक्षित असणे फार महत्त्वाचे झाले आहे. सध्या तुमचा खासगी डेटा किंवा आर्थिक ट्रांजेक्शनची माहिती लीक होण्याची शक्यता अधिक वाढली गेली आहे. अशातच नागरिकांची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक होत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस समोर येतात.
सायबर विमा का महत्त्वाचा?
सायबर गुन्ह्यांपासून दूर आणि नुकसान भरपाईसाठी सायबर विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे आजच्या काळात हेल्थ आणि लाइफ इन्शुरन्ससोबत सायबर विमा महत्त्वाचा झाला आहे.
सायबर विम्याचे फायदे
सायबर विमा घेतलेल्या व्यक्तींना बँक खाते, क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा ई-वॉलेटच्या माध्यमातून फसवणूक झाली तरीही नुकसान भरपाई मिळते. अशातच सायबर विम्यामुळे तुमची कमाई सुरक्षित राहते.
सायबर विमा का गरजेचा?
सायबर विमा तुम्हाला सायबर फसवणूक, डेटा चोरी, सायबर हल्ला आणि ब्लॅकमेलिंगसारख्या स्थितींमध्ये आर्थिक जोखीम कमी करण्यास मदत करतो.
या गोष्टी ठेवा लक्षात
सायबर विमा घेताना कंपनीच्या विम्यामधील अटी आणि नियम व्यवस्थितीत वाचून घ्या. याशिवाय सायबर विम्याची सुविधा देणारी कंपनी तुम्हाला 10-15 प्रकारच्या सायबर हल्ल्यांपासून नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देऊ शकते.
सायबर विम्याची मर्यादा
सायबर सुरक्षितता तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे यावरुनच तुम्ही सायबर विम्याची मर्यादा ठरवा. अधिक ऑनलाइन पद्धतीने ट्रांजेक्शन करणाऱ्यांनी विम्याची अधिक मर्यादा ठेवावी. कंपनी तुम्हाला 50 हजार ते एक कोटी रूपयांपर्यंतचे विम्याचे कव्हर देते.
कमी प्रीमिअम
काही कंपन्या कमी प्रीमिअममध्ये तुम्हाला अधिक फायदा होईल असे सांगते. पण हे लक्षात असू द्या, यामध्ये पॉलिसी धारकाला आधी नुकसान भरपाई द्यावी लागते आणि त्यानंतरच कंपनी तुम्हाला पेमेंट करते.
आणखी वाचा :
Flipkart Republic Day Sale 2024 : आयफोन 15 सह या स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स, जाणून घ्या अधिक
या क्रमांकावर चुकूनही करू नका फोन, सरकारने दिलाय सावधगिरीचा इशारा
Samsung कंपनीचे हे दोन 5G स्मार्टफोन झालेत स्वस्त, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स