Holi 2024 : केमिकलयुक्त रंगांना करा गुडबाय, यंदाच्या रंगपंचमीला घरच्याघरी असा तयार करा नैसर्गिक गुलाल (Watch Video)

| Published : Mar 21 2024, 01:10 PM IST / Updated: Mar 21 2024, 05:58 PM IST

Holi celebration 2024 around the world
Holi 2024 : केमिकलयुक्त रंगांना करा गुडबाय, यंदाच्या रंगपंचमीला घरच्याघरी असा तयार करा नैसर्गिक गुलाल (Watch Video)
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

बाजारात मिळणाऱ्या केमिकयुक्त गुलालमुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवण्याची भीती असते. अशातच तुम्ही घरच्याघरी यंदाच्या रंगपंचमीला नैसर्गिक गुलाल तयार करू शकता. जाणून घेऊया घरच्याघरी रंगपंचमीचे रंग कसे तयार कराल याबद्दल अधिक....

Holi 2024 :  यंदा होळीचा सण येत्या 24 मार्चला साजरा केला जाणार आहे. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्चला रंगपंचमीचा सण साजरा होणार आहे. रंगपंचमीच्या सणावेळी रंगांची उधळण केली जाते. पण रंगपंचमीला बाजारात मिळणाऱ्या रंगांमुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक वाढली जाते. जाणून घेऊया घरच्याघरी नैसर्गिक गुलाल तयार करण्याची सोपी पद्धत सविस्तर...

घरच्याघरी रंगपंचमीचे नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी सोपी ट्रिक
घरच्याघरी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी तुम्ही बेबी टाल्कम पावडर किंवा कॉर्न स्टार्च पावडर घेऊ शकता. या दोन्ही पावडर समप्रमाणत मिक्स करुन घ्या. बेबी टाल्कम पावडर किंवा कॉर्न स्टार्चमुळे तुमच्या त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही. याशिवाय कॉर्न स्टार्च पावडर किंवा बेबी पावडर वापरल्याने घरच्याघरी तुम्ही नैसर्गिक रंग तयार करू शकता.

नैसर्गिक रंग कसे तयार कराल?

लाल रंग
रंगपंचमीसाठी घरच्याघरी लाल रंग तयार करायचा असल्यास बीटाचा वापर करू शकता. यासाठी बीटाचा घट्ट पेस्ट तयार करा. बीटाच्या पेस्टमध्ये कॉर्नस्टार्च आणि गुलाब पाण्याचे चार-पाच थेंब मिक्स करा. या पेस्टमध्ये मिक्स केलेले सर्व साहित्य व्यस्थितीत ढवळून घ्या. लाल रंगासाठी तयार केलेली पेस्ट काहीवेळ वाळण्यास ठेवा. रंग तयार करताना लक्षात ठेवा की, कॉर्नस्टार्च अधिक ओलसर नसावा. अशाप्रकारे तुम्ही घरीच लाल रंग तयार करू शकता.

पिवळा रंग असा करा तयार
पिवळा रंग तयार करण्यासाठी तुम्ही हळद पावडरची घट्ट पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये बेबी टाल्कम पावडर मिक्स करून मिश्रण व्यवस्थितीत ढवळून घ्या. यानंतर एका कागदावर पिवळा रंगासाठीची पेस्ट पसरवून वाळण्यासाठी ठेवा. नैसर्गिक रंग हे केमिकयुक्त रंगांच्या तुलनेत अधिक गडद नसतात. त्यांचा रंग फिकटच असतो.

हिरवा रंग
हिरवा नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी कोणतीही हिरवी पालेभाजी किंवा पालक भाजीचा वापर करू शकता. हिरव्या पालेभाजीची घट्ट पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टमध्ये कॉर्न स्टार्च आणि टाल्कम पावडर मिक्स तयार करून एक मिश्रण तयार करा. याशिवाय पेस्टमध्ये तुम्ही गुलाब पाणीही मिक्स करू शकता. सर्व साहित्य व्यवस्थितीत मिक्स केल्यानंतर एका कागदावर रंग वाळण्यासाठी ठेवा. अशाप्रकारे तुमचा घरच्याघरी नैसर्गिक पद्धतीने हिरवा रंग तयार होईल.

VIDEO : असे तयार करा घरच्याघरी रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंग, पाहा संपूर्ण व्हिडीओ

View post on Instagram
 

आणखी वाचा : 

Holi 2024 : यंदाच्या होळीला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तयार करा दही वडे, जाणून घ्या रेसिपी स्टेप बाय स्टेप

भारतातील या प्रांतात कशी साजरी करतात होळी? त्यामागील कथा काय सांगतात जाणून घ्या

Chandra Grahan 2024 : रंगपंचमी दिवशी असणार चंद्र ग्रहण, सणावर होणार का परिणाम?

Read more Articles on