कमळाचं फूल आता फक्त तलावापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. योग्य कुंडी, माती, ऊन आणि पाणी मिळाल्यास तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा बागेतही सुंदर कमळ सहज फुलवू शकता.

Grow Lotus at Home: कमळाचं फूल म्हणजे पवित्रता, शांतता आणि सौंदर्याचं प्रतीक. अनेकांना वाटतं की कमळ फक्त तलावातच उगवतं, पण तसं नाहीये. योग्य पद्धत वापरल्यास तुम्ही घरच्या घरी बाल्कनीत किंवा बागेतही सहज कमळ वाढवू शकता. थोडी तयारी आणि नियमित काळजी घेतली की कमळाचं रोप दीर्घकाळ हिरवंगार राहतं आणि त्याला सुंदर फुलंही येतात.

स्टेप १: योग्य कुंडी आणि माती निवडा

कमळ लावण्यासाठी एक पसरट आणि खोलगट कुंडी निवडा. ही कुंडी कमीत कमी १२-१८ इंच खोल असावी आणि महत्त्वाचं म्हणजे, तिला पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्र नसावं. कुंडीमध्ये जड किंवा चिकणमाती भरा. यामुळे मुळं व्यवस्थित रुजतात आणि पाण्यावर तरंगत नाहीत.

स्टेप २: कमळाचं मूळ (ऱ्हायझोम) योग्य पद्धतीने लावा

बियांपेक्षा मुळापासून (ऱ्हायझोम) कमळ लावणं जास्त सोपं आहे. हे मूळ मातीत एका बाजूला तिरकं लावा; त्याला पूर्णपणे गाडू नका. मुळाचं टोक मातीच्या बाहेर राहील याची खात्री करा. त्यानंतर, माती हलू नये याची काळजी घेत कुंडीत हळूहळू पाणी भरा.

स्टेप ३: पाणी आणि उन्हाचा योग्य बॅलन्स साधा

कमळाच्या कुंडीत नेहमी पाणी भरलेलं असावं. पाण्याची पातळी मातीच्या वर असली पाहिजे. कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे रोज किमान ५-६ तास थेट ऊन मिळेल. योग्य ऊन आणि पाणी मिळाल्यास रोपाची वाढ झपाट्याने होते आणि फुलंही छान येतात.

कमळाच्या रोपाची काळजी कशी घ्याल?

  • कुंडीतलं पाणी कधीही पूर्णपणे सुकू देऊ नका.
  • आठवड्यातून एकदा पाणी बदलणं फायदेशीर ठरतं.
  • महिन्यातून एकदा सेंद्रिय खत (Organic Compost) किंवा पाण्यात विरघळणारं खत द्या.
  • पिवळी किंवा सुकलेली पानं वेळोवेळी काढून टाका.
  • हिवाळ्यात रोपाची वाढ कमी होते, ही एक सामान्य गोष्ट आहे.