Chandra Grahan 2024 : रंगपंचमी दिवशी असणार चंद्र ग्रहण, सणावर होणार का परिणाम?

| Published : Mar 18 2024, 05:29 PM IST / Updated: Mar 18 2024, 05:32 PM IST

Ranga Panchami and Chandra Ghrahan

सार

यंदाच्या रंगपंचमी सणावेळी चंद्र ग्रहण असणार आहे. काही दशकांनंतर होळीच्या दिवशी चंद्र ग्रहण आले आहे. अशातच नागरिकांच्या मनात ग्रहणासंबंधित काही प्रश्न असतात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Chandra Grahan 2024 : एका वर्षात चंद्र ग्रहण कितीही वेळा असू शकते. खरंतर, चंद्र ग्रहण एक खलोगीय घटना आहे. पण आपल्या देशात आणि धर्मासह शास्रात चंद्र ग्रहणाबद्दलच्या वेगवेगळ्या मान्यता आहेत. यंदा होळीच्या वेळी चंद्र ग्रहण असणार आहे. चंद्र ग्रहणावेळी नागरिकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न उपस्थितीत राहतात. अशातच रंगपंचमी (Ranga Panchami) सण असल्याने तो साजरा करायचा का असाही काहींना प्रश्न पडला असेल. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....

चंद्र ग्रहणाची वेळ
पंचांगानुसार, यंदाच्या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण 25 मार्च (सोमवारी) असणार आहे. या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. चंद्र ग्रहण सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी 3 वाजून 02 मिनिटांपर्यंत राहणार आहे. म्हणजेच ग्रहण 4 तास 39 मिनिटे असणार आहे.

भारतात दिसणार का चंद्र ग्रहण?
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार, 25 मार्चला असणारे चंद्र ग्रहण युरोप, उत्तर-पूर्व आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, अटलांटिक, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आर्कटिक आणि अंटार्कटिकासारख्या देशात दिसणार आहे. पण भारतात चंद्र ग्रहण नसणार आहे.

चंद्र ग्रहणावेळी रंगपंचमीचा सण साजरा करू शकतो?
विद्वानांच्या मते, ग्रहणाचा प्रभाव जेथे दिसते तेथेच असतो. 25 मार्चला होणारे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने कोणतेही नियम किंवा सूतक काळ नसणार आहे. यामुळे तुम्ही रंगपंचमीचा सण आनंदात साजरा करू शकता. या सणावर चंद्र ग्रहणाचा कोणताही प्रभाव होणार नाही.

आणखी वाचा : 

Holashtak 2024 : यंदा होलाष्टक कधी? या काळात शुभ कार्य करणे असते वर्ज्य

पाच रुपयांच्या लिंबूवर लावली 35 हजारांची बोली, कारण ऐकून व्हाल हैराण

ज्योतिर्लिंग आणि शिवलिंगमधील फरक काय?