सार

होळी हा संपूर्ण देशभऱ साजरा होणारा अस्सल भारतीय सण आहे. मात्र तो देशाच्या विविध प्रांतांमध्ये वेगवेगळ्याा पद्धतीने साजरा होतो.प्रांतानुसार होळीच्या नानाविध कथा आहे त्या नेमकी काय जाणून घ्या लेखातून

होळी हा सण संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. भारताच्या विविध भागांत होळी हा सण साजरा करण्याची परंपरा व पद्धती निरनिराळी आहे. म्हणूनच हा सण कधी होरी, हुताशनी, शिमगा, कामदहन म्हणून ओळखला जातो. भारताच्या काही भागांत होळी ‘वसंतोत्सव’ या नावानेदेखील प्रसिद्ध आहे. वसंत ऋतूच्या आगमनार्थ ऋतुबदलाचा सोहळा म्हणजेच होळी असा देखील समज आहे.तसेच कोकण व गोव्यात प्रसिद्ध असणारा शिमगा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

होळी साजरी करण्याच्या विविध परंपरांचा आढावा घेतला तर या परंपरा दोन भागांमध्ये विभागल्या आहेत. एक म्हणजे उत्तरेकडील तर दुसरी दक्षिणेकडील. होळीचा इतिहास सांगताना नेहमीच श्रीकृष्णाच्या कथांचा व मदनदहनाचा संदर्भ दिला जातो.भारतीय सांस्कृतिक तसेच धार्मिक परंपरांमध्ये नेहमीच विविधता आढळून येते त्यामुळे प्रांतानुसार किंवा मैलांनुसार होळी साजरी करण्याच्या पद्धती आणि कथांमध्ये बदल होताना दिसतात.त्यामुळे विविध प्रांतानुसार असलेल्या पद्धती जाणून घेणे आवश्यक आहे.

दक्षिणेतील होळी :

दक्षिण भागात होळी ‘मदनदहन’ म्हणून प्रसिद्ध आहे. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंत, किंवा अमावास्येपर्यंत प्रत्येक शिवमंदिरासमोर होळी साजरी केली जाते. या उत्सवातून मदनदहन म्हणजेच कामवासनेचे दहन केला जातो.पुरातन संदर्भानुसार ढुंढुंला राक्षसिणीने शिव-पार्वती यांना प्रसन्न करून वर मागितला होता. या वरानुसार देव, मानव कोणाचेही लहान बाळ तिला खाण्याची मुभा होती. परंतु शिवाने हे वर देताना घातलेल्या अटीनुसार शिवीगाळ करणारे, निर्लज्ज, जाळपोळ करणारे मूल तिला खाता येणार नव्हते. म्हणूनच होळीच्या दिवशी विशेष करून कोकणात शिव्या-आरोळ्या देण्याची पद्धत आहे असे मानले जाते.

उत्तरेतील होरी :

उत्तरेकडे होळीला ‘होरी’ म्हटले जाते. होळी हा सण येथे फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत गुलाल उधळून सण साजरा केला जातो. उत्तरेकडील होळी ही श्रीकृष्णकथांशी निगडित आहे. श्रीकृष्ण व होळी यांचा निकटचा संबंध समजून घेण्यासाठी बंगाल व ओरिसा येथील ‘फल्गुत्सव’ किंवा ‘दोलोत्सव’ अनुभवणे गरजेचे आहे.या दिवशी सकाळी श्रीकृष्णाची तर सायंकाळी अग्नीची पूजा केली जाते. होळीच्या दिवशी सकाळी बाळकृष्णाला पाळण्यात झुलवण्यात येते. या वेळी झोके देऊन पाळण्यातल्या बाळकृष्णला गुलाल लावण्यात येतो. तर सायंकाळी गवताची मानवाकृती करून तिचे दहन केले जाते. होळी आणि मधुराभक्ती बंगाल व ओरिसा या भागात होळीच्या सकाळी कृष्णासभोवती गोपनृत्य सादर होते. या पारंपरिक खेळात कृष्ण, गवळणी, कृष्णाचे सवंगडी फेर धरतात. विशेष म्हणजे पुरुष भक्त हे गवळणीच्या रूपात ‘रास’ खेळताना दिसतात.

कोकणातील होळी :

दक्षिण भारताचा सांस्कृतिक संगम विशेष म्हणजे कमी-अधिक फरकाने अशा स्वरूपाची होळी तळकोकणातही अनुभवास मिळते. श्रीकृष्ण, गवळण नाचविणे हे खेळ कोकणातील शिमगोत्सवाचा अविभाज्य भाग आहेत. विशेष म्हणजे शिमगोत्सवातील गवळण ही स्त्री-रूपातील पुरुष असून होळीच्या दिवशी गायल्या जाणाऱ्या लोकगीतांना येथे फागगीते म्हटले जाते. तर दाक्षिणात्य परंपरेनुसार शिमगोत्सवात मारल्या जाणाऱ्या आरोळ्या या दक्षिणी परंपरांचा प्रभाव सांगतात. हा सांस्कृतिक विविधतेत एकता दर्शविणारा आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या संस्कृतीचा अनुभव महत्वाचा आहे.

आणखी वाचा:

Chandra Grahan 2024 : रंगपंचमी दिवशी असणार चंद्र ग्रहण, सणावर होणार का परिणाम?

Holashtak 2024 : यंदा होलाष्टक कधी? या काळात शुभ कार्य करणे असते वर्ज्य

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका अधिक आताच जाणून घ्या कशामुळे होतं ? आणि त्यासाठी उपाय कोणते