Holi Decoration Ideas: ऑफिस+घर सजवण्यासाठी ट्रेंडी आयडिया
Lifestyle Feb 23 2026
Author: Rameshwar Gavhane Image Credits:pinterest
Marathi
होळी डेकोरेशन आयडिया
घरी किंवा ऑफिसमध्ये होळी पार्टीचं प्लॅनिंग करताय? मग डेकोरेशन असं हवं जे रंगीबेरंगीही दिसेल आणि फोटोफ्रेंडलीही असेल. या आयडिया वापरून तुम्ही जागेला फेस्टिव्ह लुक देऊ शकता.
Image credits: pinterest
Marathi
गुलाल थीम टेबल डेकोर
होळी पार्टीत फूड टेबल आकर्षणाचं केंद्र असतं. टेबलवर छोट्या वाट्यांमध्ये सुका गुलाल ठेवा. सोबत पिचकारी, फुलं आणि रंगीत प्लेट्स ठेवून थीम आणखी सुंदर बनवा.
Image credits: pinterest
Marathi
इको-फ्रेंडली डेकोरवर लक्ष द्या
निसर्गाची काळजी घेतली तर होळीचा खरा आनंद मिळतो. प्लास्टिक सजावटीऐवजी कागद, कापड आणि फुलांचा वापर करा. सुकलेली फुलं, ऑरगॅनिक गुलाल आणि छोटी रोपं निवडा.
Image credits: pinterest
Marathi
फेअरी लाईट्स आणि रंगीत ड्रेपिंग
संध्याकाळच्या होळी पार्टीसाठी फेअरी लाईट्स (Fairy Light) हा परफेक्ट पर्याय आहे. ऑफिसच्या कॉमन एरियात किंवा घराच्या बाल्कनीत रंगीत ओढण्या किंवा नेटचं कापड लावून त्यावर लाईट्स लावा.
Image credits: social media
Marathi
रंग-बिरंगी फुग्यांनी करा फेस्टिव्ह एन्ट्री
रंग हीच होळीची ओळख आहे, त्यामुळे सजावटीची सुरुवात प्रवेशद्वारापासून करा. बहुरंगी फुग्यांची कमान (arch) बनवा, पेपर फॅन, रंगीत ओढण्यांनी बॅकड्रॉप तयार करा. 'Happy Holi' चा कटआउट लावा
Image credits: Pinterest
Marathi
DIY कलर कॉर्नर किंवा सेल्फी झोन
होळी पार्टीसाठी 'कलर स्प्लॅश' थीम असलेली भिंत तयार करा. तुम्ही चार्ट पेपरवर रंगांचे स्प्लॅश बनवून, मोठ्या आकाराच्या पिचकाऱ्या आणि रंगांचे कटआउट्स लावू शकता.
Image credits: pexels@shrey-chapra-527051
Marathi
थीम बेस्ड ड्रेस कोड आणि डेकोर मॅचिंग
ऑफिसमध्ये होळी पार्टी असेल तर 'व्हाइट ड्रेस कोड' ठेवा. घरी पार्टी असेल तर कलरफुल थीम निवडा. थीम डेकोरेशनसाठी मटकी, ढोलकी, झेंडूची फुलं, रंगीत ओढण्या बेस्ट चॉइस आहेत.