सार

यंदा होळीचा सण 24 मार्चला साजरा केला जाणार आहे. याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्चला रंगपंचमीचा सण असणार आहे. अशातच घरी पाहुणे येणार असल्यास तुम्ही त्यांच्यासाठी घरच्याघरी दही वड्याची रेपिसी करू शकता.

Dahi Wada Recipe :  होळीचा सण देशभरात मोठ्या आनंदात-उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी घरी पुरणपोळी ते गोडाचे विविध पदार्थ तयार केले जातात. यंदाच्या होळीला घरच्या मंडळींसाठी किंवा पाहुण्यांसाठी तुम्ही दही वड्याची रेसिपी तयार करू शकता. जाणून घेऊया दही वड्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर.....

साहित्य

वड्यासाठी लागणारे साहित्य

  • 1 कप उडदाची डाळ
  • अर्धा इंच किसलेले आलं
  • 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • अर्धा चमचा काळी मिरी पावडर
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठ तेल

दह्याच्या मिश्रणासाठी लागणारे साहित्य

  • 2 कप घट्ट दही
  • अर्धा चमचा जीर पावडर
  • अर्धा चमचा लाल तिखट पावडर
  • मीठ चवीनुसार
  • चिंच-गुळाची चटणी
  • हिरवी चटणी
  • कोथिंबीर बारीक चिरलेली
  • नायलॉन शेव
  • डाळिंबाचे दाणे

कृती

  • सर्वप्रथम वडा तयार करण्यासाठी उडदाची डाळ चार ते सहा तास भिजवून ठेवा.
  • उडदाची डाळ व्यवस्थितीत भिजल्यानंतर त्यामधील पाणी काढून त्याची घट्ट आणि मऊ पेस्ट तयार करून चमच्याने 10 मिनिटे ढवळा.
  • वड्याच्या मिश्रणात किसलेले आलं, हिरवी मिरची, मीठ, काळी मिरी पावडर मिक्स करून घ्या.
  • गॅसवर कढई ठेवून तेल गरम करत ठेवा. गरम केलेल्या तेलात लहान आकारात वडे तळून घ्या.
  • वड्यांना गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढा.
  • एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात तळलेले वडे टाका, जेणेकरून ते मऊ होतील.
  • वडे मऊ झाल्यानंतर त्यामधील पाणी काढून टाका आणि एका प्लेटमध्ये ठेवा.
  • एका भांड्यात दही घेऊन त्यामध्ये जीर पावडर, लाल मिरची पावडर, मीठ मिक्स करा.
  • शेवटची स्टेप, दही वडा खाण्यासाठी सर्व्ह करण्यासाठी एक प्लेट घेऊन त्यात सर्वप्रमथ दहीचे मिश्रण घ्या आणि वडे टाका. यावरुन पुन्हा दही टाका आणि त्यावर हिरवी चटणी, चाट मसाला, नायलॉन शेव आणि डाळिंबाचे दाणे टाकून खाण्यासाठी द्या.

VIDEO :  येथे पाहा दही वड्याची रेसिपी….

View post on Instagram
 

आणखी वाचा : 

Gudi Padwa 2024 : यंदा गुढीपाडवा कधी? जाणून घ्या शुभू मुहूर्तासह पूजा-विधी

Microwave Oven Cleaning Tip : मायक्रोव्हेव ओव्हन स्वच्छ करण्यासाठी लिंबूच्या सालचा असा करा वापर, दिसेल नवा आणि चमकदार (Watch Video)

भारतातील या प्रांतात कशी साजरी करतात होळी? त्यामागील कथा काय सांगतात जाणून घ्या