MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Health Advice: सावधान! वारंवार साबणाने हात धुताय? होऊ शकतो त्वचेचा हा गंभीर आजार

Health Advice: सावधान! वारंवार साबणाने हात धुताय? होऊ शकतो त्वचेचा हा गंभीर आजार

Health Tips: दैनंदिन जीवनात स्वच्छ राहणे आणि स्वच्छता राखणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे काही आजारांपासून दूर राहता येते. पण तुम्ही दिवसात सतत हात धुता का? कारण वारंवार हात धुण्याच्या सवयीमुळे आजार मागे लागू शकतो. याचबद्दल जाणून घेऊया अधिक...

2 Min read
Author : Chanda Mandavkar
| Updated : Dec 06 2023, 06:22 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
वारंवार साबणाने हात धुण्याची सवय धोक्याची
Image Credit : Getty

वारंवार साबणाने हात धुण्याची सवय धोक्याची

Excessive hand washing: कोरोनासारख्या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोकांना सर्वाधिक सोपा उपाय म्हणून स्वच्छता ठेवणे आणि वेळोवेळी हात धुवावेत असा सांगण्यात आला होता. खरंतर स्वच्छता ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण दिवसातून सतत हात धुणे देखील आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. सतत हात धुण्याच्या सवयीमुळे त्वचेसंबंधित आजार निर्माण होऊ शकतात.

जे लोक अत्याधिक प्रमाणात हात धुतात त्यांची त्वचा अधिक कोरडी होते अथवा फाटते. यामुळे भविष्यात त्वचेशी संबंधित एक्झिमा ही समस्या उद्भवू शकते. एक्झिमा ही एक सामान्य स्थिती असली तरीही खाज येणे, लाल चट्टे येणे ही देखील या रोगाची कारणे ठरू शकतात. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, साबणातील रासायनिक पदार्थांमुळे त्वचेचे नुकसान होते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
 एक्झिमा (Eczema) रोग नक्की काय आहे?
Image Credit : Getty

एक्झिमा (Eczema) रोग नक्की काय आहे?

एक्झिमा ही त्वचेशी संबंधित होणाऱ्या समस्येपैकी एक आहे. एक्झिमावर वेळीच उपचार न केल्यास याचा संसर्ग होऊ शकतो. हा रोग जीवघेणा देखील ठरू शकतो. डॉक्टरांच्या मते, अनुवांशिक व वातावरणातील बदलांमुळेही एखाद्या व्यक्तीला एक्झिमा आजराची लागण होऊ शकते. एक्जिमाची समस्या बहुतांशवेळा बालपणापासूनच सुरू होऊ शकते. - काही प्रकरणांत एक्झिमाची लक्षणे लहान मुलांमध्येही आढळतात.

36
एक्जिमाची लक्षणे
Image Credit : Getty

एक्जिमाची लक्षणे

  • त्वचा लाल होणे
  • त्वचेवर तपकिरी अथवा जांभळ्या रंगाचे डाग पडणे
  • त्वचा जळजळणे आणि सूज येणे
  • चिडचिड होणे
  • त्वचेला खाज येणे किंवा त्वचेवर पुरळ किंवा मोठे फोड येणे
  • त्वचा कोरडी होऊन रक्त येणे

    संशोधनातील माहितीनुसार, साबणाने वारंवार हात धुतल्याने त्वचा जळजळण्याची समस्या निर्माण होते. जेव्हा आपण रगडून किंवा जोर देऊन हात धुता तेव्हा त्वचेतील नाजूक पेशींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, यामुळेच त्वचा जळजळण्याचा त्रास होतो.
46
असे धुवा हात
Image Credit : Getty

असे धुवा हात

अमेरिकन अ‍ॅकेडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या (American Academy Of Dermatology) मते, एखाद्या व्यक्तीला एक्जिमाची समस्या असल्यास त्याने हात धुताना पुढील काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे.

  • हातांसाठी केमिकल-फ्री साबणाचा वापर
  • दहा सेकंदच हात धुवावेत
  • बोट आणि नखं स्वच्छ धुवावीत
  • गरमऐवजी कोमट पाण्याचा वापर
  • हात धुतल्यानंतर स्वच्छ टॉवेलने पुसावे
  • हाताला मॉइश्चराइझर लावावे
56
साबणाचा वापरू शकतो का?
Image Credit : Getty

साबणाचा वापरू शकतो का?

एक्जिमाच्या संक्रमणापासून दूर रहायचे असल्यास नेहमीच हात स्वच्छ धुवावेत. सतत हात धुण्याच्या सवयीमुळे एक्जिमाची समस्या निर्माण होत असल्यास साबणाचा वापर करणे टाळावा. केमिकल-फ्री साबणाचा वापर करावा. ज्यामध्ये सोडियम लॉरिल सल्फेट गुणधर्म नसतील असा साबण वापरावा. बाजारात मिळणाऱ्या हर्बल साबणाचा देखील वापर हात धुण्यासाठी करू शकता.

आणखी वाचा: 

DRY CLEANचा खर्च टाळायचाय? घरच्या घरी असा स्वच्छ धुवा ओव्हरकोट

Health Care: शरीरातील व्हिटॅमिन बी-5 ची कमतरता दूर करतील हे फूड्स

इन्फ्लूएंझा किंवा सीझनल फ्लूची लक्षणे आढळल्यास काय करावे व काय करू नये?

66
तज्ज्ञांचा सल्ला
Image Credit : Getty

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Chanakya Niti : कुटुंबात कोणाचं ऐकावं आणि कोणाकडे दुर्लक्ष करावं? चाणक्य नीती काय सांगते?
Recommended image2
Gold Bangles : सोन्याच्या बांगड्यांचे सुंदर ट्रेंडी डिझाईन.. हे कलेक्शन एकदा पाहाच
Recommended image3
High Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे? मग हे 4 पदार्थ खाणं आजच सोडा
Recommended image4
Bay Leaf : मोज्यांमध्ये तमालपत्र ठेवून झोपल्यास काय होतं? जाणून घ्या रहस्य
Recommended image5
Premature Grey Hair : कमी वयात केस पांढरे होतायत? हे घरगुती उपाय नक्की करून पाहा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved