Fashion Tips: पेस्टल आउटफिट्सवर स्टायलिश लुकसाठी अशी निवडा ज्वेलरी
- FB
- TW
- Linkdin
पेस्टल आउटफिट्ससाठी परफेक्ट ज्वेलरी
Fashion Tips In Marathi: एखादे फंक्शन असो किंवा लग्नसोहळा, सध्या पेस्टल रंगातील आउटफिट्सचा ट्रेंड सुरू आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही ज्या अभिनेत्रींनी यंदा लग्नगाठ बांधली, त्यांनीही लग्नातील मुख्य कार्यक्रमासाठी पेस्टल रंगाच्याच आउटफिट्सची निवड केली होती.
पेस्टल रंगाच्या पोषाखांवर परिधान करण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्येही ज्वेलरीचे वेगवेगळे पर्याय सहज उपलब्ध मिळतील. पण पेस्टल रंगाच्या पोषाखासाठी नेमके कशा पद्धतीच्या ज्वेलरीची निवड करावी? यामुळे तुमचाही गोंधळ उडतो का. चिंता करू नका, जाणून घेऊया ज्वेलरी निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबाबतच्या सोप्या टिप्स…
मरुन रंगाची ज्वेलरी
पेस्टल रंगाच्या आउटफिट्ससोबत (Pastel color outfits) योग्य ज्वेलरी निवडायची असेल तर गडद रंग निवडावा. यासाठी तुम्ही मरुन रंग म्हणजेच रुबी रंगाची ज्वेलरी निवडू शकता. याचे काही पॅटर्न्स बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील. एखाद्या मोत्यांचा किंवा डायमंड नेकलेसची आपण निवड करू शकता.
पेस्टल रंगाच्या शेड्सची ज्वेलरी
पेस्टल रंगाच्या शेड्समधील एखादे मीनाकारी डिझाइन असलेले नाजूक व साध्या पद्धतीचे किंवा मल्टी कलर ज्वेलरीही आपण निवडू शकता. खरंतर मीनाकारी डिझाइनची ज्वेलरीची किंमत फार महाग असते. त्यामुळे तुमचे बजेट कमी असेल तर अशाच प्रकारे लुक असणारा दुसरा एखादा दागिना आपण खरेदी करू शकता.
व्हाइट स्टोन ज्वेलरी
पेस्टल रंगाच्या आउटफिट्सवर नक्की कोणती ज्वेलरी निवडावी? हे कळत नसेल तर ट्रान्सपरंट किंवा पांढऱ्या रंगाची स्टोन ज्वेलरी (Jewellery on pastel outfits) निवडू शकता. यामुळे तुम्हाला क्लासी लुक मिळेल. अशा पद्धतीच्या ज्वेलरीमध्ये बरेच पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. यापैकीच एक लोकप्रिय प्रकार म्हणजे अनकट डायमंड ज्वेलरी, या ज्वेलरीचीही महिलावर्गामध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळते.
स्टोन वर्क ग्रीन पर्ल नेकलेस
जर तुमच्या लेहंग्याचा रंग फिकट गुलाबी असेल तर तुम्ही त्यावर स्टोन वर्क ग्रीन पर्ल असणारे नेकलेस आपण परिधान करू शकता. या पेस्टल रंगासोबत अशा प्रकारची ज्वेलरी सुंदर दिसते. स्टोन वर्क ग्रीन पर्ल नेकलेस हा काही लेअर्समध्येही मार्केटमध्ये मिळेल.
गोल्डन आणि ब्ल्यू पर्ल नेकलेस
तुम्ही परिधान करणार असणाऱ्या लेहंग्यामध्ये पेस्टल रंगासह निळ्या रंगाचाही टच देण्यात आला असेल तर आपण गोल्डन-ब्ल्यू रंगाच्या पर्ल नेकलेसची निवड करू शकता. रॉयल ब्ल्यू रंगामुळे तुमचा लुक अधिकच आकर्षक व मनमोहक दिसेल.
'या' गोष्टींचीही घ्या काळजी
- पेस्टल आउटफिट्स हे सकाळच्या वेळेस असणाऱ्या एखाद्या फंक्शनसाठीच परिधान करावे.
- अशा पद्धतीच्या आउटफिट्सवर अति गडद स्वरुपातील मेकअप करणं टाळावे. कारण पोषाख व तुमचा मेकअप एकमेकांना अनुरूप दिसणार नाही. यामुळे तुमचा संपूर्ण लुक बिघडण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा:
मॉडर्न पारंपरिक लुक हवाय? मग खरेदी करा Rashmika Mandannaसारखे 10 ड्रेस
चेहऱ्यावर हवाय ब्युटी पार्लर ट्रीटमेंटसारखा ग्लो? मग फॉलो करा या टिप्स
ओठ मऊ व गुलाबी दिसावेत यासाठी कोणते नैसर्गिक उपाय करावेत? जाणून घ्या