चेहऱ्यावर हवाय ब्युटी पार्लर ट्रीटमेंटसारखा ग्लो? मग फॉलो करा या टिप्स
Lifestyle Nov 02 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:freepik
Marathi
नैसर्गिक उपाय
सुंदर व डागविरहित त्वचा मिळवण्यासाठी महिलावर्ग कित्येक उपाय करतात. पण काहीजणी नैसर्गिक उपाय करण्यावर अधिक भर देतात. कारण त्यांना केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करायचा नसतो.
Image credits: freepik
Marathi
नाइट स्किन केअर रुटीन गरजेचे
त्वचेची देखभाल करण्यासाठी नाइट केअर रुटीनही तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे दिवसभराचा थकवा, प्रदूषण व सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचं झालेले नुकसान भरून निघण्यास मदत मिळते.
Image credits: freepik
Marathi
कोरफड
झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्यास त्वचा हायड्रेट राहील व चेहऱ्यावर तेजही येईल. यासाठी कोरफडीचा गर लावून हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करावा.
Image credits: Getty
Marathi
व्हिटॅमिन ई कॅप्सूल
नारळाचे तेल किंवा नाइट क्रीममध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून लावल्यास त्वचेवर नॅचरल ग्लो येण्यास मदत मिळू शकते.
Image credits: freepik
Marathi
नारळाचे तेल
आयुर्वेदामध्ये फार पूर्वीपासूनच त्वचेची काळजी घेण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर केला जातो. कारण यामुळे त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळते.
Image credits: Getty
Marathi
हळद व कच्चे दूध
हळद व कच्च्या दुधाची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला खूप फायदे मिळतील. यामुळे डेड स्किन, डार्क सर्कल, सन टॅन यासारख्या समस्या कमी होतील.
Image credits: freepik
Marathi
गुलाब पाणी
गुलाब पाणी विकत आणण्याऐवजी घरच्या घरी तयार करून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य खुलण्यास मदत मिळेल.
Image credits: Getty
Marathi
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.