ओठ मऊ व गुलाबी दिसावेत यासाठी काय करावे? जाणून घ्या
गुलाबी ओठांमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात अधिक भर पडते. सोबतच तुमचे हास्य देखील खुलते. आपणही मऊ व गुलाबी ओठांसाठी उपाय शोधताय का? मग जाणून घेऊया टिप्स
मऊ व गुलाबी ओठांसाठी ब्युटी केअर रुटीनमध्ये मधाचा समावेश करावा. मधामुळे ओठांचा कोरडेपणा कमी होईल.
कमी प्रमाणात पाणी प्यायल्यास कोरड्या त्वचेची समस्या उद्भवते. याचा परिणाम ओठांवरही होऊ शकते. ओठ हायड्रेट राहावेत, यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. ज्यामुळे ओठ मऊ होतील.
ओठांची त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी मिठाने स्क्रब केल्यास फायदे मिळू शकतात. यामुळे ओठांवरील मृत त्वचा व कोरडेपणाची समस्या कमी होईल. तसेच ओठ गुलाबी व मऊ देखील होतील.
रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर गुलाब पाणी लावावे. यामुळे ओठांवरील मृत त्वचेची समस्या दूर होऊन ओठ मऊ व गुलाबी होतील. तसंच ओठांना मॉइश्चराइझरही मिळेल.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ओठांसाठी योग्य लिप बामची निवड करावी. लिप बाममुळे ओठ कोरडे होणे, ओठाची त्वचा फाटणे यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळले.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.