महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांमध्ये वर्ष 2019 नंतर 1300 कोटी रुपयांपैकी फक्त 10 टक्के वसूली करण्यात आल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी दिली आहे. याशिवाय राज्यातील नागरिकांचे दररोज तीन कोटी रुपयांचे नुकसान सायबर गुन्ह्यांमुळे होतेय.
दिल्लीतील एम्स रुग्णालय आता ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांसाठी भारतातील संगीताच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करणार आहेत. खरंतर, ही म्युझिक थेरपी काय आहे याबद्दल एम्सच्या न्यूरोलॉजी विभागाच्या प्रोफेसर डॉ. दीप्ति विभा यांनी अधिक माहिती दिली आहे.
'व्हॅलेंनटाइन वीक' मधील सहावा दिवस म्हणजेच 12 फेब्रुवारील 'हग डे' साजरा केला जाणार आहे. या दिवसानिमित्त तुम्ही पार्टनरला तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी खास मेसेज पाठवू शकता.
येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंनटाइन डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी आलियासारखा चेहऱ्यावर ग्लो हवाय का? पुढील काही फेस मास्क तुम्ही नक्की ट्राय करू शकता.
सध्या सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे .
शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' आंदोलनामुळे दिल्ली पोलीस हाय अॅलर्टवर आहे. दिल्लीच्या सर्व सीमेवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. याशिवाय हरियाणातील सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
पुणे येथे गीताभक्ती अमृत मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहोत्सवाला काही प्रतिष्ठित साधू-संतांनी उपस्थिती लावली. याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यक्रमादरम्यान, मुघलांमुळे नव्हे शिवाजी महाराजांमुळे आमची ओळख असल्याचे विधान केले आहे.
जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्तींना Ischemic Cerebrovascular Stroke चे निदान झाल्याची माहिती रुग्णलायकडून देण्यात आली आहे. अशातच दिग्दर्शक पथिकृत बसू यांनी मिथुन यांच्या हेल्थबद्दल एक अपडेट दिली आहे.
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाला धमकीचा इमेल आला आहे. धमकीचा इमेल आल्याने मुंबईतील बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये गेल्या आठवड्यात साधुच्या वेषात आलेल्या मुलाने आपणच 20 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेलो तुमचा मुलगा असल्याचे एका परिवाराला सांगितले. घरातील मंडळी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाला पुन्हा पाहिल्याने आनंदित झाले होते.