Teachers Day 2024 : शिक्षकांना देण्यासाठी 6 खास भेटवस्तू, होतील आनंदीत
- FB
- TW
- Linkdin
)
शिक्षक दिनानिमित्त गिफ्ट आयडिया
प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबरा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रति सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करतात. या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते. शिक्षकांचा आपल्या आयुष्याला कलाटणी लावण्यामागे फार मोठा वाटा असतो. अशातच यंदाच्या शिक्षक दिनानिमित्त आवडत्या शिक्षकांना काय गिफ्ट द्यावे असा विचार करत असाल तर पुढील ऑप्शन पाहू शकता.
स्मार्ट नोटबुक
मार्केटमध्ये 200 रुपयांपर्यंत स्मार्ट नोटबुक खरेदी करता येईल. शिक्षक दिनानिमित्त स्मार्ट नोटबुक बेस्ट गिफ्ट ठरू शकते. याशिवाय नोटबुकमध्ये शिक्षकाप्रति खास मेसेजही लिहू शकता.
डायरी अथवा पुस्तक
शिक्षक दिनानिमित्त तुमच्या आवडीच्या शिक्षकाला डायरी अथवा एखादे पुस्तक गिफ्ट करू शकता. प्रत्येक शिक्षकाला स्वत:ची खासगी डायरी ठेवणे पसंत असते. अशातच डायरीच्या गिफ्टचा विचार करू शकता.
पेन
शिक्षक आणि पेनाचे सखोल नाते असते असे म्हटले जाते. शिक्षक दिनावेळी शिक्षकाला फाउंटेन पेन, इंक पेन गिफ्ट करू शकता. अथवा शिक्षकाला पर्सनलाइज्ड पेनही देऊ शकता.
टी मग
शिक्षक दिनानिमित्त हटके गिफ्ट द्यायचे असल्यास टी मग चा ऑप्शन बेस्ट आहे. यावर प्रेरणादायी कोट्स लिहू शकता.
रोप
शिक्षकाला एखादे रोप गिफ्ट करू शकता. मनी प्लांट किंवा एखादे फुलांचे रोपटेही खरेदी करू शकता.
किचन
शिक्षकांना किचन पर्सनलाइज्ड किचन गिफ्ट करू शकता. जेणेकरुन शिक्षक आपल्या गरजेच्या चावी लावू शकतात.
आणखी वाचा :
Teachers Day 2024 निमित्त आयुष्यातील शिक्षकाला खास Wishes पाठवून द्या करा वंदन
Teachers Day 2024 : शिक्षक दिनानिमित्त शाळेत, महाविद्यालयात देण्यासाठी सोपे भाषण