सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाच्या काही तास आधी वराचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सोनाक्षीच्या घरी पोहोचलेल्या नवीन ड्रेसचे व्हिज्युअलही समोर आले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हाही घराबाहेर दिसली आहे.
Gautam Adani Salary : अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांना 9.26 कोटींचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. पण त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्यापेक्षा अधिक आहे. कोणाची आहे जास्त कमाई?
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे.
इंदूर विधानसभा क्रमांक 3च्या राजकारणात हस्तक्षेप करणारे मोनू कल्याणे हे कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या खास होते. गोळी लागल्याने जखमी झालेल्या मोनूला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
बसपा प्रमुख मायावती यांनी रविवारी (२३ जून) त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून बहाल केले. अशा प्रकारे त्यांना पुन्हा त्यांचा उत्तराधिकारी घोषित करण्यात आले.
तेलंगणात काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात देखील कर्जमाफी व्हावी अशी मागणी किसान सभेने केली आहे.
Sushma Andhare on Eknath Shinde : जळगाव येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 23 जून रोजी सांगितले की, अधिक आव्हानात्मक परिस्थितीत प्रक्षेपण वाहनाची स्वायत्त लँडिंग क्षमता प्रदर्शित करून पुन्हा वापरता येण्याजोग्या लॉन्च व्हेईकल लँडिंग प्रयोगात सलग तिसरे यश मिळविले आहे.
मनोरंजन विश्वातून पुन्हा एकदा एक वाईट बातमी ऐकायला मिळत आहे. यावेळी बातमी आहे पंजाबी फिल्म इंडस्ट्रीची. 32 वर्षीय पंजाबी अभिनेता रणदीप सिंग भंगू यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा मृत्यू त्यांच्याच एका मोठ्या चुकीमुळे झाला.
एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून दोघांना चिरडले. या घटनेनंतर पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला.