सार

Navaratri 2024 Devi Aarti In Marathi : येत्या 3 ऑक्टोंबर पासून ते 11 ऑक्टोंबरपर्यंत नवरात्रौत्सव साजरा केला जाणार आहे. या दरम्यान, देवीच्या वेगवेगळ्या रुपांची मनोभावे पूजा केली जाते. अशातच देवीची  पूजा करता पुढील काही आरती नक्की म्हणा.

Navaratri 2024 Devi Aarti In Marathi : हिंदू धर्मात नवरात्रौत्सवाला फार महत्व आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवावेळी देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील शुल्क पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होते. यंदा शारदीय नवरात्रौत्सव 3 ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहे. अशातच नवपरात्रौत्सवावेळी देवीच्या पूजेवेळी पुढील काही आरती म्हणू शकता. जेणेकरुन आयुष्यातील दु:ख दूर होत सुख-समृद्धी येईल.

दुर्गे दुर्घट भारी

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥

वारी वारीं जन्ममरणाते वारी ।

हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।

चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥

साही विवाद करितां पडिले प्रवाही ।

ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।

क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥

अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।

नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

देवी नवरात्रीची आरती

उदो बोला उदो, अंबाबाई माऊलीचा हो । उदो कारे गर्जती, काय महिमा वर्ण तिचा हो। उदो बोला उदो ॥ धृ॥ अश्विन शुद्ध पक्षी, अंबा बैसली सिंहासनी हो। प्रतिपदेपासून, घटस्थापना ती करूनी हो । मूलमंत्रजप करूनी, भोवते रक्षक ठेवोनी हो । ब्रम्हा विष्णू रुद्र, आईचे पूजन करती हो ॥१॥ उदो बोला द्वितीयेचे दिवशी, मिळती चौसष्ट योगिनी हो। सकळांमध्ये श्रेष्ठ, परशुरामाची जननी हो । कस्तुरी मळवट, भांगी शेंदूर भरूनी हो। उदो कारे गर्जती, सकळ चामुंडा मिळुनी हो ॥२॥ उदो बोला तृतीयेचे दिवशी, अंबे श्रृंगार मांडिला हो। मळवट पातळ चोळी, कंठी हार मुक्ताफळा हो । कंठीचे पदके कासे, पितांबर पिवळा हो। अष्टभुजा मिरविती, अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ ३॥ उदो बोला चतुर्थीचे दिवशी, विश्वव्यापक जननी हो,। उपासका पाहसी, अंबे प्रसन्न अंतकरणी हो । पूर्णकृपे तारिसी, जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माऊली, सुर ते येती लोटांगणी हो ।॥४॥ उदो बोला पंचमीचे दिवशी, व्रत ते उपांगललिता हो। अर्घ्य पाय पूजने, तुजला भवानी स्तविती हो । रात्रीचे समयी, करिती जागरण, हरिकथा हो। आनंदे प्रेम ते, आले सद्भावे क्रीडता हो ।॥५॥ उदो बोला षष्ठीचे दिवशी, भक्ता आनंद वर्तला हो। घेऊनी दिवट्या हस्ती, हर्षे गोंधळ घातला हो । कवडी एक अर्पिता, देसी हार मुक्ताफळा हो। जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ।।६॥ उदो बोला….सप्तमीचे दिवशी, सप्तश्रृंग गडावरी हो। तेथे तू नांदसी, भोवती पुष्पे नानापरी हो । जाई जुई शेवंती, पूजा रेखीयली बरवी हो। भक्त संकटी पडता, झेलूनी घेसी वरचे वरी हो ।॥७॥ उदो बोला….अष्टमीचे दिवशी, अष्टभुजा नारायणी हो। सह्याद्री पर्वती, पाहिली उभी जगत् जननी हो । मन माझे मोहीले, शरण आलो तुजलागुनी हो । स्तनपान देऊनी, सुखी केले अंतःकरणी हो ।।८॥ उदो बोला नवमीचे दिवशी, नव दिवसांचे पारणे हो। सप्तशती जप, होमहवने सद्भक्ती करुनी हो ।षड्रस अन्ने नैवेयासी, अर्पियली भोजनी हो। आचार्य ब्राह्मणा, तृप्त केले कृपेकरुनी हो ।।९॥ उदो बोला दशमीचे दिवशी, अंबा निघे सिमोल्लंघनी हो। सिंहारूढ करी दारुण, शस्खे अंबे त्वा घेऊनी हो । शुभ निशुंभादिक राक्षसा, किती मारिसी रणी हो। विप्रा रामदासा, आश्रय दिधला तव चरणी हो ।॥१०॥ उदो बोला…

महालक्ष्मीची आरती


जयदेव जयदेवी जय लक्ष्मीमाता। प्रसन्न होऊनिया वर देई आता ।। धृ।। विष्णुप्रिये तुझी सर्वातरी सता। धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता ।।1।। विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही। धावसी आम्हालागी पावसी लवलाही ।।2।। त्रैलोक्य धारिणी तू भक्ता लाभे सुखशांती। सर्व सर्वही दुःख सर्व ती पळती ।।3।। वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे। देसि दान वरदे सदैव सौख्याचे ।।4।। यास्तव अगस्ती बन्धु आरती ओवाळी। प्रेमे अक्तासवे लोटांगण घाली ।।5।

आणखी वाचा : 

Navaratri वेळी कन्यापूजन करताना लक्षात ठेवा या 6 गोष्टी

Navaratri 2024 : मुंबईतील या देवीच्या मंदिरात नाणे चिकटल्यास पूर्ण होतात इच्छा