सार

Government Job : रेल्वे भरती बोर्डाकडून 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अंतर्गत तंत्रज्ञ पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. पाहा येथे नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखांसह अन्य माहिती सविस्तर...

RRB Technician Recruitment 2024 : शासकीय नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण रेल्वे भरती बोर्डाकडून 10 पास उमेदवारांसाठी 14,298 रिक्त पदांवर नोकर भरती केली जाणार आहे. यापैकी 1883 मध्ये मुंबईतील आहेत. उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही असू शकते असेही रेल्वे भरती बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. तंत्रज्ञ पदासाठी नोकर भरती केली जाणार असून उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. जाणून घेऊया अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रतेसह वेतनासह अन्य काही महत्वाची माहिती सविस्तर...

रेल्वे भरती बोर्ड तंत्रज्ञ भरती 2024

  • पदाचे नाव : तंत्रज्ञ
  • एकूण रिक्त पदे : 14,298 पदे (मुंबईत 1883 पदे)
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI, B.Sc. / बी.टेक. / डिप्लोमा.
  • वेतन : दरमहा रु. 19,900/- ते रु. 29,200/- पर्यंत.
  • वयोमर्यादा: 18 – 33 वर्षे.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
  • अर्ज करण्यासाठी वेबसाइट : https://mahasarkar.co.in/rrb-mumbai-recruitment/

या नोकरीअंतर्गत ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाइन पद्धतीने करावा असे सांगण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठीची तारीख 02 ऑक्टोंबर, 2024 पासून सुरु होणार असून अंतिम तारीख 16 ऑक्टोंबर 2024 देण्यात आली आहे. याशिवाय अर्ज करताना ओपन कॅटेगरीतील उमेदवारांना अर्जासाठी 500 रुपये शुल्क तर रिझर्व्ह कॅटेगरीतील उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. सर्वाधिक महत्वाचे म्हणजे उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर व्यवस्थितीत वाचावा. अन्यथा अर्जात चूक झाल्यास तो रद्द केला जाईल असेही नोकर भरतीच्या परिपत्रकात स्पष्ट सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

IBPS RRB Clerk prelims result 2024: लिपिक पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

१०वी - १२वीनंतर इंडियन नेव्हीत कशी मिळवायची नोकरी, घ्या जाणून