श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मराठ्यांनी आरक्षण मागितले पाहिजे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिकमधील शांतता रॅलीवरून छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगेंकडे आता कोणी लक्ष देत नाही असा दावा भुजबळांनी केला आहे. तसेच, जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात आणि मुख्यमंत्री व्हावे असा टोलाही त्यांनी लगावला.
युनिसेफने मध्य प्रदेशातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या आरोग्यास प्रोत्साहनासाठी 19 लाख मुलींच्या खात्यात 57.18 कोटी जमा केले.
कोलकातामध्ये डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याने निदर्शने सुरू आहेत. बंगाल सरकार महिला सुरक्षेसाठी नवीन निर्देश जारी करणार आहे, ज्यात महिला कर्मचाऱ्यांसाठी रात्रीच्या ड्युटींवर बंदी घालणे समाविष्ट आहे.
माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट महिन्याचे एकत्रित ३००० रुपये राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यात जमा झालेत. मात्र ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होतील याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे.
कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर संताप आणि निषेध सुरू असताना, मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये मद्यधुंद गटाने एका महिला निवासी डॉक्टरवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.