गुलाबी रंग प्रेमाचे प्रतीक मानला जातो. पण तुम्हाला माहितेय का, गुलाबी रंगाचा राग किंवा भांडणासोबत संबंध आहे.
एक्सपर्ट पंकित गोयल यांच्यानुसार अधिक गुलाबी रंगाच्या वापरामुळे हलका वाद किंवा भांडण होऊ शकते.
गुलाबी रंगामुळे अत्याधिक भावनिकता आणि संवेदनशीलता वाढू शकते. लहान-लहान गोष्टीवरुन वाद होऊ शकतात. नात्यात अनावश्यक वादही होण्याची शक्यता असते.
किचनमध्ये किंवा दक्षिण-पूर्व दिशेला गुलाबी रंगाचा वापर केल्यास वाद, भांडणे अधिक होण्याची शक्यता वाढली जाते.
गुलाबी रंगाचा अत्याधिक वापर केल्याने व्यक्तीमधील अवास्तविक अपेक्षा अधिक वाढल्या जातात. याशिवाय व्यवहारिक आयुष्यात असंतोष आणि निराशा येऊ शकते.
गुलाबी रंगाचा अधिक वापर केल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे बैचेन वाटणे, तणाव आणि डोकेदुखी अशा समस्या उद्भवू शकतात.
गुलाबी रंगाचा वापर मर्यादेत करावा. याचा वापर केवळ सजावट करण्यासाठी करू शकता. याशिवाय दक्षिण-पूर्व किंवा उत्तर दिशेला गुलाबी रंगाचा वापर करू शकता.