Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 ऑगस्टला गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. खरंतर, देशभरात गणेशोत्सवाची धूम पहायला मिळते. अशातच मुंबईत विविध गणेश मंडळांच्या गणपतींचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. याचेच काही फोटो समोर आले आहेत.
Narali Purnima 2024 Puja Vidhi : श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात. नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा. आज नारळी पौर्णिमेचा सण असून कोळी बांधव दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात.
Narali Purnima 2024 Wishes in Marathi : कोळी बांधवांचा प्रमुख सण असणारा नारळी पौर्णिमेला सण आज (19 ऑगस्ट) साजरा केला जात आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास Messages, Wishes, WhatsApp Status पाठवून सण साजरा करा.
अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत नारायणगावात काळे झेंडे दाखवण्यात आले. तर, श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंनी मराठ्यांनी आरक्षण मागितले पाहिजे का असा प्रश्न उपस्थित केलाय. तसेच, बेंगळुरूमध्ये एका तरुणीवर ऑटोचालकाने बलात्कार केल्याची घटना घडली.
जम्मू-काश्मीरातील विधानसभा निवडणुकीत भाजपने कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती न करता अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची रणनीती आखली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी काश्मीर खोऱ्यातील 8 ते 10 अपक्ष उमेदवारांसोबत निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
यूपीच्या बुलंदशहरमध्ये रविवारी एका भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. बस आणि मॅक्स पिकअपची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.