हेल्दी त्वचेसाठी मेकअप हटवणे फार महत्वाचे असते. यासाठी वाइप्स की क्लींजिंग मिल्कचा वापर करावा याबद्दल जाणून घेऊया...
वाइप्स केवळ त्वचेवर असणारा मेकअप हटवण्यास मदत करतात. याशिवाय वारंवार वाइप्सचा वापर केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते.
पाण्याशिवाय लगेच मेकअप हटवण्यासाठी वाइप्स बेस्ट पर्याय आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या सुगंधातील वाइप्स मिळतात.
क्लीजिंग मिल्क त्वचेच्या पोर्समध्ये जाऊन मेकअप आणि घाण दूर करण्यास मदत करते. यामुळे त्वचा हाइड्रेट आणि मऊ राहण्यास मदत होते.
क्लीजिंग मिल्कचा वापर केल्यानंतर फेस वॉश करणे महत्वाचे आहे.
एकदा खरेदी केलेले क्लींजिंग मिल्क काही आठवड्यापर्यंत वापरता येते.
दररोजचा मेकअप हटवण्यासाठी क्लींजिंग मिल्क बेस्ट पर्याय आहे. क्लीजिंग मिल्क प्रवासावेळी मेकअप हटवण्यासाठी मदत करते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.