महाराष्ट्रातील राजकीय भूकंपापासून ते बॉलिवूडपर्यंत, जाणून घ्या टॉप 10 बातम्या

| Published : Aug 13 2024, 08:13 PM IST

top 10 news today
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपापासून ते बॉलिवूडपर्यंत, जाणून घ्या टॉप 10 बातम्या
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

ओबीसी नेते मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला, तर अजित पवारांनी सुनेत्रांना उभे करण्याची चूक कबूल केली. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दूध उत्पादकांना दिलासा दिला.

जरांगेंची नाशिकमध्ये गर्जना, भुजबळांच्या बालेकिल्ल्यात उदयनराजेस्टाईल उडवली कॉलर

ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिकमध्ये मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप झाला. यावेळी जरांगे यांनी भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला आणि आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली.

2. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय: दूध उत्पादकांना मिळणार दिलासा

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या १३ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पादकांना दिलासा देण्यात आला असून, महापालिकांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.

3. अजित पवारांची स्फोटक कबुली, 'सुनेत्रांना उभे करायला नको होते'

अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंविरुद्ध उभे करणे ही चूक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचे नसते आणि त्यावेळेस त्यांच्याकडून चूक झाली.

4. लाडक्या बहिणींसाठी देवेंद्र फडणवीसांचा खास संवाद, जाणून घ्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राखी पौर्णिमेला राज्यातील बहिणींशी संवाद साधणार आहेत. हा संवाद 'लाडक्या बहिणींचा देवाभाऊ' या उपक्रमांतर्गत होणार आहे.

5. सुप्रिया सुळेंचा माढ्यात दमदार प्रचार, रवी राणा आणि शिंदे गटावर हल्लाबोल

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे शिवस्वराज्य यात्रेत धडाकेबाज भाषण केले. त्यांनी आमदार रवी राणा आणि शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी राज्यातील सत्ताधारी सरकारवरही जोरदार टीका केली.

6. आसाराम बापूंना तब्बल 11 वर्षात पहिल्यांदाच पॅरोल मंजूर

अल्पवयीन अनुयायी बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंना ७ दिवसांचा जामीन मंजूर झाला आहे. गेल्या ११ वर्षात त्यांना जामीन मिळण्याची ही पहिलीच वेळ असून पुण्यातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी पॅरोल देण्यात आला आहे.

7. लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला दणका

पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला लाडकी बहीण योजनेवरुन धारेवर धरले आहे. जमीन मालकाला योग्य मोबदला न दिल्यास लाडकी बहीण योजनेवर बंदी घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

8. मुन्नावर फारुकी वाद: कोकण वक्तव्यावरून मागितली माफी, मनसे झाली होती आक्रमक

स्टँडअप कॉमेडियन मुन्नावर फारुकी यांनी त्यांच्या स्टँडअप दरम्यान कोकण, महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी वापरलेल्या भाषेमुळे वाद झाला. राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आणि माफीची मागणी केली. वाद वाढताच मुन्नावरने सोशल मीडियावर माफी मागितली.

9. राजकरणामुळे सिनेसृष्टीतील करिअवर प्रभाव पडतोय? कंगना राणौत म्हणते...

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणाऱ्या कंगना राणौतने राजकरणातही एन्ट्री केली आहे. यामुळे कंगनाला सिनेमांच्या शूटिंगसाठी वेळ मिळत नाहीये. यावरच अभिनेत्रीने उघडपणे भाष्य केले आहे.

10. श्रीदेवी यांच्या वाढदिवासानिमित्त बोनी कपूर यांनी शेअर केली भावूक पोस्ट

Sridevi Birth Anniversary : बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. यानिमित्त श्रीदेवींच्या आठवणीत पती बोनी कपूर यांनी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.