सार

Sridevi Birth Anniversary : बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. यानिमित्त श्रीदेवींच्या आठवणीत पती बोनी कपूर यांनी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

Sridevi birth anniversary :  भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. श्रीदेवी, सिनेसृष्टीतील अशा पहिल्या अभिनेत्री होत्या ज्या सुपरस्टार ठरल्याच. पण अभिनेत्राने वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती. आज श्रीदेवी आपल्यात नसल्या तरीही त्यांच्या चाहत्यांकडून त्यांची नेहमीच आठवण काढली जाते.

खुशी कपूरची खास पोस्ट
श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूरने आईची आठवण काढत इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. स्टोरीमध्ये आपली बहीण जान्हवी कपूरसोबतचा बालपणीचा एक फोटो आहे. या फोटोच्या माध्यमातून जुन्या आठवणींना खुशीने उजाळा दिला आहे. याशिवाय दोन्ही बहीणी आईच्या खुशीत अत्यंत आनंदी असल्याचे फोटोमधून दिसतेय. दुसऱ्या बाजूला बोनी कपूर यांनीही श्रीदेवी यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

बोनी कपूर यांची खास पोस्ट
बोनी कपूर यांनी पत्नी श्रीदेवी यांचा एक एडिटेड फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा फोटो वर्ष 2012 मध्ये आलेल्या इंग्लिश-विंग्लिश सिनेमातील आहे. बोनी कपूर यांनी फोटोखाली खास कॅप्शन लिहित म्हटले की, हॅप्पी बर्थडे माय जान. याशिवाय पोस्टवर संजय कपूर यांनी देखील श्रीदेवी यांची आठवण काढत कमेंट केली आहे.

View post on Instagram
 

युजर्सच्या प्रतिक्रिया
एका युजरने म्हटले की, प्रिय श्रीदेवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्याने म्हटले, वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅम, तुमची फार आठवण येते. तिसऱ्याने म्हटले की, तुम्ही नेहमीच बेस्ट होता. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया श्रीदेवी यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर केल्या जात आहेत.

श्रीदेवी यांचा डेब्यू सिनेमा
तमिळ सिनेमा 'कंधन करुनई' (1967) मधून श्रीदेवी यांनी डेब्यू केला होता. या सिनेमावेळी श्रीदेवी केवळ चार वर्षांच्या होत्या. यानंतर वर्ष 1970 मध्ये तेलुगु सिनेमाममध्ये 'मां नन्ना निर्दोषी' मधून डेब्यू केला होता. याशिवाय मल्याळम सिनेमा 'पूमपट्टा'मधून झळकल्या होत्या. या सिनेमासाठी श्रीदेवी यांना केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट चाइल्ड आर्टिस्टने गौरवण्यात आले होते. यानंतर श्रीदेवी यांनी तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषांमधील अनेक सिनेमांमध्ये काम केले.

श्रीदेवी यांचे बॉलिवूडमधील सिनेमे
वयाच्या 16 व्या वर्षी श्रीदेवी यांनी पहिला सिनेमा 'सोला सावन' केला होता. या सिनेमाच्या चार वर्षांनंतर 'हिम्मतवाला' केला, जो ब्लॉकबस्टर ठरला. श्रीदेवी यांची हिंदी सिनेमातील प्रसिद्धी वाढली गेली आणि यानंतर अभिनेत्रीने बॅक टू बॅक सुपरहिट सिनेमे दिली. 'जानी दोस्त', 'जस्टिस चौधरी', 'मवाली', 'तोहफा', 'बलिदान', 'औलाद', 'घर संसार', 'सदमा', 'मिस्टर इंडिया', 'चांदनी', 'जुदाई' सारखे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते.

आणखी वाचा :

मी अजूनही विवाहित आहे...ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर अभिषेकने सोडले मौन

Pushpa 2 सिनेमातील आयटम सॉन्गसाठी समंथा नव्हे या अभिनेत्रींच्या नावाची चर्चा