
Uddhav Thackeray's Shivaji Park Speech in Mumbai
नीट पेपरफुट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. "अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले" असे म्हणत त्यांनी हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असल्याचा दावा केला. धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मृत्यूंचा मुद्दा उपस्थित केला. तसेच महागाई, घसरता रुपया, केंद्रातील मंत्र्यांची भूमिका आणि देशाच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले.