किरिट सोमय्यांचा मुंब्र्यात 40 हजार बांगलादेशी मतदारांचा दावा

Share this Video

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत भाष्य करत विदर्भ आणि मराठवाड्यात नोंदणीचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगितले. मात्र कोकण, पुणे, नाशिक, मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरात ही प्रक्रिया संथ असल्याचे त्यांनी म्हटले. भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, देवनार, गोवंडी आणि उमरखाडी येथे बांगलादेशी नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळल्याचा तसेच मुंब्र्यात 40 हजार बांगलादेशी मतदारांची नोंदणी करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवरही प्रतिक्रिया दिली.

Related Video