Shaina NC

Share this Video

शायना एनसी यांनी गणेशोत्सवादरम्यान विजेचा धक्का लागून अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याबद्दल दुःख व्यक्त केले. लाईव्ह वायरजवळ लोखंडी स्ट्रक्चर नसावे, जनरेटर आणि साउंड सिस्टिम वेगवेगळी ठेवावी, पावसाच्या पार्श्वभूमीवर लाईट्सना वॉटरप्रूफ कव्हरिंग असावे आणि मेटल स्ट्रक्चर, लाईट पोल तसेच मूर्तीच्या फ्रेमचे योग्य अर्थिंग करावे, असे त्यांनी सांगितले. गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी या उपायांची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. कोस्टल रोडवरील दुर्घटनेत तीन तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याबद्दलही त्यांनी दुःख व्यक्त केले. कोस्टल रोड हा रेस ट्रॅक नसल्याचे सांगत स्पीड कॅमेरे, उंच क्रॅश बॅरिअर्स आणि रात्रीची कडक गस्त आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. नागरिकांनी ड्रिंक अँड ड्राइव्ह आणि रॅश ड्रायव्हिंग टाळून नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. राहुल गांधी यांच्यावरही शायना एनसी यांनी टीका केली. पंतप्रधानांच्या आईची मिमिक्री करून अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेतला.

Related Video