सार
PhD Vegetable Seller : वेळेवर पगार मिळत नव्हता आणि त्यातही पगारात कपात होत असल्याने घराची जबाबदारी पार पाडणे कठीण झाले होते, असे डॉ. संदीप सिंग यांनी सांगितले.
PhD Vegetable Seller : चार विषयांत पदव्युत्तर पदवी, कायदा या विषयामध्ये मिळवली पीएचडी. तरीही पंजाबमधील या तरुणावर बेरोजगारीची वेळ आली आहे. डॉ. संदीप सिंग या तरुणाची कहाणी ऐकल्यानंतर मनातील भावना व्यक्त होण्यासाठी शब्दच मिळणार नाहीत.
11 वर्षे विद्यापीठात कंत्राटी प्राध्यापकाची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता डॉक्टर संदीप सिंग भाजीपाल्याची विक्री करत आहेत. इतके शिक्षण घेतल्यानंतरही केवळ आपल्या घराची जबाबदारी निभावण्यासाठी संदीप सिंग यांना भाजीपाला विकावा लागत आहे.
भाजीपाला विकण्याची वेळ का आली?
पगार वेळेत मिळत नव्हता आणि पगारामध्ये कपातही होत असल्याने घरखर्चाची जबाबदारी पार पाडणे कठीण होत होते, अशी व्यथा संदीप यांनी मांडली. पण त्यांनी हार पत्करलेली नाही, भाजीपाला विकून ते आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.
पंजाब विद्यापीठात 11 वर्षे प्राध्यापक म्हणून केले काम
डॉ. संदीप सिंग हे पतियाळातील पंजाबी विद्यापीठामध्ये कायदे विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. या विद्यापीठात त्यांनी सुमारे 11 वर्षे कंत्राटी प्राध्यापक म्हणून काम केले. पण पगार वेळेवर मिळत नसल्याने तसेच पगारात कपातही होत असल्याने नोकरी सोडल्याची माहिती त्यांनी दिली. पगार मिळण्यास होणारा विलंब आणि कपातीमुळे घरखर्च भागवताना अडचणींचा सामना करावा लागत होता. नोकरी सोडल्यानंतर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला.
पण अभ्यास सुरूच आहे…
डॉ.संदीप सिंग यांनी पत्रकारिता, पंजाबी भाषा, पॉलिटिकल सायन्स आणि कायदा या चार विषयांत पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना पीएचडी पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. आयुष्यातील अडचणी कमी झालेल्या नाहीत, पण यावर मात करत त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला आहे.
पीएचडी भाजीवाले संदीप सिंग सांगतात की, घरोघरी जाऊन हातगाडीवर भाजीपाला विकतो. कंत्राटी प्राध्यापक म्हणून जेवढे कमावले असते, त्यापेक्षा जास्त कमाई भाजी विकून होत आहे. भाजीपाल्याची विक्री झाल्यानंतर ते आपल्या घरी जातात आणि पुढील परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करताहेत.
कोचिंग सेंटरचे स्वप्न
डॉ. संदीप सिंग यांनी सांगितले की, त्यांनी केवळ शिकवणीपासून विश्रांती घेतली आहे, पण शिकवण्याची आवड अजूनही कायम आहे. स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्या ते बचत करत आहे. एक दिवस कोचिंग सेंटरचे स्वप्न नक्कीच सत्यात उतरवेन, असेही त्यांनी ठरवले आहे.
डॉ. संदीप सिंग यांच्या जिद्दीला सलाम!
आणखी वाचा :
ITR फायलिंग ते सिमकार्ड खरेदी, या 7 गोष्टींमध्ये आजपासून मोठे बदल
ISRO XPoSat Satellite : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ISROला मोठे यश, XPoSat उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
धक्कादायक! महिलेला प्रेग्नेंट करा व 13 लाख रूपयांचे बक्षीस मिळवा, लोकांना गंडा घालणारी टोळी गजाआड
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कधीपर्यंत होणार पूर्ण? जाणून घ्या UPDATES