अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कधीपर्यंत होणार पूर्ण? जाणून घ्या UPDATES
- FB
- TW
- Linkdin
चंपत राय यांनी शेअर केले फोटो
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे नवीन फोटो शेअर केले आहे. सध्या नक्षीकाम व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.
नृपेंद्र मिश्र यांनी केली पाहणी
श्रीराम मंदिर कन्स्ट्रक्शन कमिटीचे चेअरमन नृपेंद्र मिश्र यांनीही मंदिरात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना-निर्देशही दिले आहेत.
'घाईघाईत काम होणार नाही'
मंदिराचे कोणतेही काम घाईघाईत केले जात नाहीय, अशीही माहिती नृपेंद्र मिश्र यांनी दिली आहे. पाहणीदरम्यान बांधकामाशी संबंधित असलेले वरिष्ठ अधिकारी व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
तीन टप्प्यांत होणार बांधकाम
मंदिराची उभारणी तीन टप्प्यांत पूर्ण केली जाईल, असेही नृपेंद्र मिश्र यांनी स्पष्ट केले. सध्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू आहे आणि उद्घाटनानंतर दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होईल.
पहिल्या टप्प्यातील काम कधी होईल पूर्ण?
नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले की मंदिराचे पहिल्या टप्प्यातील बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यातील काम जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होईल.
कधी पूर्ण होणार बांधकाम?
नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले की, मंदिर उभारणीच्या तिसऱ्या टप्प्यात कॉम्पलेक्सचे काम पूर्ण करण्यात येईल. यानंतर श्री राम मंदिर उभारणीचे कार्य पूर्ण होईल.
विशेष सुरक्षा व्यवस्था
अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वागतद्वार व जन्मभूमि पथचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल. यासह सुरक्षेसाठीची सर्व उपकरणे बसवली जातील.
16 जानेवारीपासून उद्घाटनाच्या तयारीची सुरुवात
राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी सुरुवात 16 जानेवारीपासून केली जाईल. मंदिर परिसरात अखंड वैदिक हवन पूजेचे कार्यही सुरू आहे.
22 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन सोहळा
22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देश-परदेशातील हजारो पाहुणे या सोहळ्यास हजेरी लावणार आहेत.
आणखी वाचा
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी पाठवण्यात आल्या तब्बल 42 घंटा, पाहा भाविकांनी कशी केली पूजा
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजीच का? जाणून घ्या कारण
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर निर्मितीमुळे रोजगार वाढला, फुल विक्रेत्यांना अच्छे दिन - स्थानिक