1 जानेवारी 2024पासून या 7 गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. ज्यामुळे थेट तुमच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
RBIने बँक लॉकर अॅग्रीमेंटमधील काही नियमांमध्ये सुधारणा केली आहे. यानुसार जर तुम्ही नवीन नियमांचे पालन करत नसाल तर बँक लॉकर रिकामे करावे लागू शकते.
एक वर्षाहून अधिक काळ सक्रिय नसलेले UPI आयडी/क्रमांक तात्काळ बंद करण्याचा निर्णय UPIने घेतला आहे. 1 जानेवारी 2024पासून UPI आयडी निष्क्रिय करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
1 जानेवारीपासून सिम कार्ड खरेदीसाठी डिजिटल KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आता कागदावर आधारित असणारी KYC प्रक्रिया संपुष्टात येणार आहे व ग्राहकांना E-KYC प्रक्रिया करावी लागेल.
ब्ल्यू डार्टसह एक्सप्रेस लॉजिस्टिक ब्रँड चालवणाऱ्या DHL ग्रुपने 1 जानेवारी 2024पासून कुरिअर सेवेच्या किंमतीत 7 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे कुरिअर सेवा देखील महागणार आहे.
दंडासह इनकम टॅक्स भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023पर्यंत देण्यात आली होती. मुदतीनुसार प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लोकांना 1 जानेवारीपासून ITR भरण्यासाठी दंड भरावा लागेल.
5 लाख रूपयांपेक्षा कमी उत्पन्नावर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल, तर त्याहून अधिक उत्पन्नावर 5 हजार रूपये दंड आकारण्यात येईल.
नववर्षात कार खरेदी करणे महागणार आहे. Hyundai, Mercedes यासारख्या अनेक कंपन्यांनी 1 जानेवारीपासून वाहनांच्या किंमतीत वाढवल्या आहेत. त्यामुळे कार खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील.
1 जानेवारी 2024पासून आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 50 रूपये शुल्क भरावे लागणार आहे. यापूर्वी 31 डिसेंबर 2023पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.
जानेवारी महिन्यात बँकांना 14 दिवस सुटी असणार आहे. सुट्ट्यांचा क्रम वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या दिवशी असेल. त्यामुळे बँकेमध्ये जाण्यापूर्वी एकदा सुट्ट्यांची यादी नक्की तपासून पाहा.