ISRO XPoSat Satellite : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ISROला मोठे यश, XPoSat उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

| Published : Jan 01 2024, 01:39 PM IST / Updated: Jan 01 2024, 01:49 PM IST

XPoSat Mission

सार

ISRO XPoSat Satellite : इस्रोने नववर्ष 2024च्या पहिल्याच दिवशी मोठे यश मिळवले आहे. ब्लॅक होल्सचे रहस्य उलगडण्यासाठी उपग्रह प्रक्षेपित करणारा भारत हा आता अमेरिकेनंतरचा दुसरा देश ठरला आहे.

ISRO XPoSat Satellite : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोने मोठे यश मिळवले आहे. 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी इस्रोने XPoSat उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. ब्लॅक होल्सचे रहस्य उलगडण्यासाठी उपग्रह प्रक्षेपित करणारा भारत आता अमेरिकेनंतरचा दुसरा देश ठरला आहे. हा उपग्रह आपल्या अचूक कक्षेत यशस्वीपणे प्रस्थापित झाला आहे.

XPoSat उपग्रह अचूक कक्षेत स्थापित

ब्लॅक होल्स मिशनचे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की, XPoSat उपग्रहाचे PSLV-58 रॉकेटच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आणि उपग्रह अचूक कक्षेत स्थापित देखील झाला आहे. या कक्षेनंतर पीएसएव्ही खालील कक्षेत स्थापित केले जाईल. काही वेळानंतर ते काम करण्यासही सुरुवात करेल. 

इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी पुढे असेही सांगितले की, हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेपासून सुमारे 650 किलोमीटर दूरवर आहे आणि आमचे टार्गेट ऑरबिट देखील त्यापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे ही स्थिती उत्कृष्ट आहे. भारताचा उपग्रह आपल्या कक्षेमध्ये यशस्वीरीत्या स्थापित झाला आहे.

भारतीय उपग्रह किती प्रभावी ठरेल?

1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी XPoSat उपग्रह लाँच केल्यानंतर ब्लॅक होल्सचा अभ्यास करणारा भारत हा दुसरा देश ठरला आहे. यापूर्वीही अमेरिकेने ही कामगिरी केली आहे.  चांद्रयान-3 मोहीमेच्या यशानंतर आपल्या भारत देशाने ही मोहीम हाती घेतली आहे. या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर पोलरायझेशन आणि ब्लॅक होल्सच्या रेडिएशनचा अभ्यास केला जाणार आहे.

या उपग्रहाच्या माध्यमातून न्युट्रॉन स्टार्सचा देखील अभ्यास करण्यात येणार आहे. या उपग्रहामध्ये पॉलिक्स आणि एक्सपेक्ट अशा नावाचे दोन पेलोड आहेत. उपग्रह पॉलिक्स पेलोडद्वारे थॉमसन स्कॅटरिंगच्या माध्यमातून वैश्विक स्त्रोतांमधून उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेचा अभ्यास करणे शक्य होईल. सोबतचे 8-30keVमध्ये क्ष-किरणांचे ध्रुवीकरणही मोजले जाऊ शकते.

आणखी वाचा :

'जय श्री राम'च्या जयघोषात दिल्लीहून अयोध्येला विमानाचे पहिले उड्डाण, पाहा VIRAL VIDEO

धक्कादायक! महिलेला प्रेग्नेंट करा व 13 लाख रूपयांचे बक्षीस मिळवा, लोकांना गंडा घालणारी टोळी गजाआड

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कधीपर्यंत होणार पूर्ण? जाणून घ्या UPDATES