Air India Express Flight From Hyderabad Suffers Nose Wheel Failure On Landing In Phuket: हैदराबादहून फुकेतला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस विमानाच्या लँडिंगवेळी नोज व्हीलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मात्र, पायलटच्या कौशल्यामुळे विमानातील सर्व १३३ प्रवासी सुखरूप असून एक मोठी दुर्घटना टळली आहे.
Air India Express Flight From Hyderabad Suffers Nose Wheel Failure On Landing In Phuket बँकॉक: हैदराबादहून थायलंडला जाणारं एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान एका मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावल्याची घटना घडली आहे. फुकेत विमानतळावर लँडिंग करताना विमानाच्या नोज व्हीलमध्ये (पुढच्या चाकात) तांत्रिक बिघाड झाला. पण पायलटच्या हुशारीमुळे विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं आणि त्यातील सर्व १३३ प्रवासी सुखरूप आहेत. या घटनेनंतर फुकेत विमानतळाची धावपट्टी (रनवे) बंद करण्यात आली आहे.
अपघातातून बचावलेलं विमान बोईंग 737-मॅक्स8 मॉडेलचं होतं. एअर इंडिया एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, ११ मार्च रोजी हैदराबाद-फुकेत विमानाला लँडिंगवेळी नोज व्हीलमध्ये समस्या आली. विमानाच्या लँडिंग गिअर सिस्टीममध्ये नोज व्हील हा एक महत्त्वाचा भाग असतो. हे विमान हैदराबादहून सकाळी ६:४२ वाजता निघालं होतं आणि स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:४० वाजता फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. सध्या विमान धावपट्टीवरच अडकलं आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत धावपट्टी बंद राहणार आहे. यामुळे अनेक विमानांना दुसऱ्या विमानतळांवर वळवण्यात आलं आहे.


