15 ऑगस्ट ही मराठी शिकायची शेवटची तारखी - सरनाईक

Share this Video

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्याच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. 15 ऑगस्ट ही मराठी शिकण्यासाठीची अंतिम मुदत असून, त्यानंतर नियमांनुसार कारवाई अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली व्यवहारातील जुजबी मराठी शिकण्याची संधी देण्यात आली आहे. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून मराठी शिकवण्यासाठी 1600 शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले असून, शिक्षकांच्या मानधनासाठी एक कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.36 वर्षांपूर्वीच्या नियमाचा उल्लेख करताना चालकांनी बॅच देताना मराठी शिकण्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले. 15 ऑगस्टनंतरही मराठी न शिकलेल्या चालकांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.दरम्यान, समृद्धी महामार्गावर एका ट्रक चालकाने पोलिसांनी पैसे मागितल्याचा आरोप करत आपले वाहन आडवे लावून वाहतूक अडवली. या घटनेत संबंधित वाहनावर चलन जारी करण्यात आले होते. त्यानंतर चालकाने एलाकेळी परिसरात वाहन आडवे लावून वाहतुकीत अडथळा निर्माण केला. वाहतूक काही वेळाने सुरळीत करण्यात आली असून, चालकाविरोधात मेघे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा आणि FIR दाखल करण्यात आल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

Related Video