किशोरी पेडणेकर यांची ब्रिजभूषण प्रकरणावर भाजपवर टीका

Share this Video

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ब्रिजभूषण सिंह प्रकरणावर प्रतिक्रिया देत महिला कुस्तीपटूंना न्याय मिळाला का, असा सवाल उपस्थित केला. न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख करत त्यांनी भाजपवर टीका केली आणि महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.यावेळी त्यांनी राम मंदिर आणि सिद्धिविनायक मंदिरातील कथित चोरीच्या आरोपांवरही भाष्य केले. तसेच अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबाबत केलेल्या मागणीवर प्रतिक्रिया देत लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.पप्पू यादव यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान झालेल्या हल्ल्याचाही त्यांनी निषेध केला. याशिवाय बिहारमधील राजकीय घडामोडींवर बोलताना प्रशांत किशोर यांच्या कामाची आणि त्यांच्या संघाची प्रशंसा करत मेहनत करणारा पुढे जातो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Related Video