E-20 पेट्रोलविरोधात नितीन गडकरींच्या घराकडे मोर्चा

Share this Video

E-20 इंधन धोरणाच्या विरोधात युवक काँग्रेस आणि NSUI कार्यकर्त्यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा अडवत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.आंदोलनादरम्यान E-20 इंधनामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा आणि सामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. E-20 धोरण मागे घ्यावे, पेट्रोलचे दर कमी करावेत आणि या धोरणासाठी जबाबदार असलेल्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात युवक काँग्रेस आणि NSUI कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या इंधन धोरणाचा निषेध केला.

Related Video