Abhijeet Dipke

Share this Video

अभिजीत दिपके यांनी UPIवरील चार्जेस मागे घेण्याची मागणी करत त्याला ‘सरळ लूट’ म्हटले. गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सरकारी शाळेला भेट देत धोकादायक इमारत, पाणी, वीज, स्वच्छतागृह आणि शिक्षकांच्या कमतरतेचे प्रश्न त्यांनी मांडले. धोकादायक घोषित केलेल्या वर्गात विद्यार्थी शिकत असल्याने दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त याच शाळेत दिवा लावून खंडहर झालेली शाळा ‘बर्थडे गिफ्ट’ म्हणून देत असल्याचे ते म्हणाले.

Related Video