मला पळून जाऊन लग्न करायचे होते...सोनाक्षीसोबतच्या लग्नावर जहीरची प्रतिक्रिया

| Published : Jul 24 2024, 09:26 AM IST / Updated: Jul 24 2024, 09:28 AM IST

Sonakshi Sinha Latest Photos with Zaheer Iqbal

सार

Zaheer Iqbal on Wedding with Sonakshi : बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी जून महिन्यात एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. कपल त्यांच्या आयुष्यात खूप आनंदीत आहेत. आता जहीरने त्याला लग्न कशा पद्धतीने करायचे होते याचा खुलासा केला आहे.

Zaheer Iqbal on Wedding With Sonakshi Sinha : बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालने 23 जूनला एकमेकांसोबत विवाह केला. कपलने मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर संध्याकाळी काही खास मित्र आणि परिवारासोबत रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी बॉलिवूडमधील काही कलाकारांनी उपस्थिती लावली होती. लग्नाआधी अभिनेत्रीला आई, वडील आणि भावाकडून विरोध लग्नासाठी विरोध केला जात असल्याचे बोलले जात होते. पण लग्नावेळी सोनाक्षीचा परिवारा दिसला. अशातच लग्नाच्या एका महिन्यानंतर जहीर इक्बालने लग्नाबद्दल त्याचे काय विचार होते हे स्पष्ट केले आहेत.

पळून जाऊन लग्न करायचे होते…
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालच्या मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सोनाक्षीला तिच्या लव्ह स्टोरीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर तिने दिलखुलासपणे त्याचे उत्तर दिले आहे. याशिवाय कपलला लग्नाच्या प्लॅनबद्दलही विचारण्यात आले. यावर सोनाक्षीने म्हटले की, मला नेहमीच परिवाराच्या उपस्थितीत लग्न करायचे होते अशी इच्छा होती. परिवाराच्या परवानगीनंतरच होणाऱ्या पतीसोबत सात वचन द्यायची-घ्यायची होती. यावर जहीर म्हणतो, मला तर पळून जाऊन लग्न करायचे होते.

जहीरने लग्नाबद्दलचा त्याचा विचार स्पष्ट करत म्हटले की, "मला पळून जाऊन परदेशात लग्न करायचे होते. यानंतर पुन्हा घरी यायचे होते. पण नंतर कळले असे लग्न भारतात मान्य नाही. यामुळेच लग्नाबद्दलचा प्लॅन बदलला."

सोनाक्षीचे लग्नाबद्दलचे स्वप्न
सोक्षानीने पुढे म्हटले की, मला अगदी लहान पद्धतीने लग्न करायचे होते. मी जहीरने लग्नासाठी विचार केलेला प्लॅन रद्द केला. लग्नसोहळ्यातील फंक्शनमध्ये नातेवाईक आणि मित्रपरिवार सहभागी होण्यासाठी कोणतीच समस्या नव्हती. या सर्वांना लग्नासाठी आमंत्रित करायचे होते. लग्नासाठी एका मोठ्या पार्टीचाही विचार केला होता. आम्ही सर्वांनी खूप मजा-धम्माल केली."

View post on Instagram
 

शत्रुघ्न सिन्हांची जहीरला भीती
जहीरने म्हटले की, "शत्रुघ्न सिन्हांची भीती वाटत होती. कारण दिग्गज कलाकाराच्या लेकीचा हात कसा मागायचा यामुळे खूप नाराज होतो. सोनाक्षीचे वडील ओरडल्यास तर काय होईल याचाही विचार येत होता. पण सोनाक्षीच्या वडिलांनी आमच्या लग्नासाठी होकार दिला. शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले की, मियां बीवी राजी तो क्या करेगा काजी"

आणखी वाचा : 

फिल्म इंडस्ट्रीमध्ये Deepika Padukone टॉपवर, SRK-प्रभासलाही टाकले मागे

Ananya Pandey ने खरेदी केलेल्या नव्या कारची किंमत ऐकून व्हाल हैराण